मुंबई, दि. १७ - दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकर मोठया उत्साहाने मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. यंदाचे मुंबई मॅरेथॉनचे हे तेरावे वर्ष असून, सहभागी झालेल्या धावपटूंना चिअरअप करण्यासाठी राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि बॉलिवूडचे कलाकार सहभागी झाले आहेत. हाफ मॅरेथॉनमध्ये महिला गटात मराठी मुलींनी आपली छाप उमटवली. हाफ मॅरेथॉनमध्ये मोनिका राऊत पहिली आली, मनिषा साळुंखेने दुसरा तर, मोनिरा आथरेने तिसरा क्रमांक पटकावला. पुरुषांच्या गटात हाफ मॅरेथॉनमध्ये दीपक बाबू कुमार पहिला आला. त्याने एक तास सहा मिनिट आणि एक सेकंदात शर्यत पूर्ण केली. २१ कि.मी.च्या हाफ मॅरेथॉनला पहाटे पाच वाजून ४० मिनिटांनी वरळी डेअरी येथून सुरुवात झाली. मॅरेथॉनमध्ये विविध शर्यती होत असून, मॅरेथॉमनमधील मुख्य ४२ किमीच्या शर्यतीला राज्यपाल विद्यासागर राव यांनी झेंडा दाखवला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment