0

हेडलाईन्स:

1.  हिमजवान हनुमंतप्पांची मृत्यूशी झुंज संपली, पार्थिव हुबळी विमानतळावर दाखल, आज मूळगावी बेटादूरला होणार अंत्यसंस्कार———————————

2. इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची हस्तकच, साक्षीदरम्यान डेव्हिड हेडलीची कबुली, हेडलीकडून नाव वदवून घेतल्याचा इशरतच्या कुटुंबियांचा दावा———————————

3. जर इशरत अतिरेकी नव्हती, तर पाकिस्तानी अतिरेक्यांसोबत काय करत होती? बनावट चकमक प्रकरणातल्या डी. जी. वंजारा यांचा सवाल———————————

4. शिक्षण खात्याचा तुघलकी फतवा मागे, सहलीसाठी घातलेले निर्बंध उठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा———————————

5. लोकलच्या अपघातांचं सत्र कायम, विलेपार्ले स्टेशनवरचा अपघात सीसीटीव्हीत, तर लोकलमधल्या चोरट्याला माझाच्या ओबी इंजिनिअरनं धाडसानंपकडलं———————————

6. मेक इन इंडियाच्या कार्यक्रर्मात सेना-भाजपचं ऑल ईज वेल, समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना आवताण———————————

7. शंभर वर्षापूर्वी आईनस्टाईन भाकीत केलेल्या गुरुत्वीय लहरी सापडल्या,  शतकातल्या सर्वात मोठ्या संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांचा मोलाचा वाटा———————————

8. भारत आणि श्रीलंका संघांमधला दुसरा ट्वेन्टी 20 सामना आज रांचीतहोणार, धोनी ब्रिगेडसाठी मालिकेत करो या मरोची स्थिती———————————

9. फिल्मी फ्रायडेला प्रेक्षकांसाठी दोन चित्रपटांची मेजवानी, हिंदीत कतरीनाचा फितूर तर मराठीत समीर पाटलांच्या पोश्टर गर्लची प्रेक्षकांना उत्सुकता

Post a Comment

Random Post

 
Top