मुंबई :आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाचे अर्जभरलेल्या ग्राहकांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. म्हाडाच्या कोकण विभागीय मंडळाकडून बांधण्यात येणाऱ्या घरांची सोडत आज निघणार आहे.वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात 4275 घरांसाठी ही सोडत पार पडणारआहे. कोकण विभाग विरार-बोळींज, ठाण्यातील कावेसर आणि बाळकुम तसेच वेंगुर्ला परिसरात 4 हजाराहून अधिक घरं बांधणार आहे.घरांसाठीची संगणकीय सोडत आज पार पडणार आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न कोण साकार करतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
कुठे किती घरं?*.
विरार – 3,755 घरं*.बाळकुम (ठाणे) – 19 घरं*.कावेसर (ठाणे) – 164 घरं*.मीरा रोड – 310 घरं*.वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) – 27 घरंकोणत्या गटासाठी किती घरं?*.अत्यल्प उत्पन्न गट – 329 घरं*.अल्प उत्पन्न गट – 2,630 घरं*.मध्यम उत्पन्न गट – 1,311*.उच्च उत्पन्न गट – 6
डिपॉझिट किती?
*.अत्यल्प उत्पन्न गट – 5 हजार 300 रुपये*.अल्प उत्पन्न गट – 10 हजार 300 रुपये*.मध्यम उत्पन्न गट – 15 हजार 300 रुपये*.उच्च उत्पन्न गट – 15 हजार 300 रुपये
कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा:
*.अत्यल्प उत्पन्न गट – 16 हजार रुपयांपर्यंत*.अल्प उत्पन्न गट – 16,001 ते 40,000 रुपये*.मध्यम उत्पन्न गट – 40,001 ते 70,000 रुपये*.उच्च उत्पन्न गट – 70,001 पेक्षा
जास्तघरांच्या किंमती:
*.अत्यल्प उत्पन्न गट – 4 ते 12 लाख रुपयांदरम्यान घर
*.अल्प उत्पन्न गट – 18 ते 24 लाख रुपयांदरम्यान घर
*.मध्यम उत्पन्न गट –18 लाख रुपये (वेंगुर्ला), 41 लाख रुपये (विरार)
*.उच्च उत्पन्न गट – सुमारे 41 लाख रुपय
Post a Comment