0

आजचा शेती सल्ला:

बटाटे साठवन-इरफ़ान शेख,केज,बीड

काही ठिकाणी बटाटा पीक काढनीस आले आहे किंवा या महिन्या अखेर बटाटे काढ़निस येतील. उत्पादन खर्चाचा हिशोब पाहता किमान ९-१० रुपएच्या पुढे भाव परवडतो. आवक वाढल्या नंतर दुर्दैवाने भाव घटतो. भाव घटला तर साठवण करुण भाव वाढ होई पर्यंत थांबता येवू शकते.त्या साठीची माहिती.सर्वसाधारण तापमानास बटाटा जास्त काळ टिकून राहत नाही. त्याचे वजन झपाट्याने कमी होते. तसेच सुक्ष्मजंतू व किडींमूळे बटाटा सडून खराब होण्याची भीती असते. म्हणून बटाटा खाण्यासाठी तसेच बेण्यासाठी शीतगृहात २.२ अंश ते ३.३ अंश सेल्सीअस तापमान व ७५-८० टक्के आर्द्रतेवर साठवून ठेवल्यास उत्तम स्थीतीत राहू शकतो.जेथे शीतगृहाची सोय नाही तेथे स्थानिक पद्धतीने बटाटे हवेशीर जागेत जमीनीवर रेती पसरवून त्यावर एका थरात पसरवून ठेवतात. मधून मधून तपासणी करून सडके बटाटे काढून टाकतात.दुस-या स्थानिक पद्धतीत सावलीत २.५ मीटर लांब, १ मीटर रूंद व ६०-७५ सेमी खोल खड्डा करून बटाटे साठवतात. याला अरणी पद्धत म्हणतात. खड्ड्यात पाणी शिंपडतात व दोन दिवसांनी खड्ड्याच्या आतील बाजूवर लिंबाची पाने, वाळलेले गवत, किंवा उसाचे चिपड पसरवितात.बांबूच्या दोन पोकळ नळ्या १.५ मीटर लांबीच्या खड्ड्यात १.२ मीटर अंतरावर उभ्या ठेवाव्यात, खड्ड्याच्या वरून १५सेमी भाग सोडून त्यात बटाटे भरावेत. त्यावर ३० सेमी जाडीचा वाळलेल्या गवताचा थर द्यावा. उन पावसापासून बचावासाठी त्यावर छप्पर करावे. पोटँटो ट्यूँबर माँथचा त्रास होऊ नये म्हणून फाँलीडाल पावडर दर क्विंटलला १००-१५० ग्रम या प्रमाणात पसरावी.

Post a Comment

Random Post

 
Top