0

भारताचा पाकिस्तानवर विजय..

धोनीच्या टीम इंडियानं पाकिस्तानवर 5 विकेट्सनी मात करून आशिया चषकात आपला सलग दुसरा विजय साजरा केला. मिरपूरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात गोलंदाजांचंच वर्चस्व पाहायला मिळालं. आधी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 83 धावांवर गुंडाळलं. मग विजयासाठी 84 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद आमिरनं रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेला भोपळाही न फोडता माघारी धाडलं. मग आमिरनंच रैनाचीही विकेट काढली. त्यामुळंभारताची अवस्था तीन बाद 8 अशी केविलवाणी झाली होती. पण विराट कोहली (48) आणि युवराज सिंगनं भारताला संकटातून बाहेर काढलं आणि टीम इंडियाचाविजय निश्चित केला.
post by Ajanale nagari news.

Post a Comment

Random Post

 
Top