0

विराट आणि युवराजच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानचा पराभवFirst Published :27-February-2016 : 22:00:00Last Updated at: 27-February-2016 : 22:02:28

मीरपूर, दि. 27 - आशिया कप टी 20 मध्ये झालेल्या भारत - पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये भारताने 5 विकेट राखत पाकिस्तानचा पराभव केला आहे. सुरुवातीलाच 8 धावांवर 3 गडी बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि युवराज सिंगने केलेल्या संयमी खेळीमुऴे भारताने हा सामना जिंकला. पाकिस्तानकडून भारताला देण्यात आलेलं 84 धावांचं आव्हान भारताने 15.3ओव्हरमध्ये पुर्ण केलं. विराट कोहलीने 49 तर युवराज सिंगने नाबाद 14 धावा केल्या. विराट कोहली 49धावांवर असताना पायचीत झाल्याने हाफ सेंच्युरी हुकली. पाकिस्तानतर्फे मोहम्मद आमीरने भारताचे 3 गडी बाद केले मात्र त्यानंतर कोणत्याच गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.पाकिस्तानकडून भारताला 84 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. भारत हा सामना सहज जिंकेल असं वाटल असताना पाकिस्तानने मात्र भारताला सुरुवातीला कडवी झुंज दिली. पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद आमीरने भारताचे 2 गडी बाद केल्याने भारताचा पराभव होईल अशी शंका व्यक्त होऊ लागली. रोहीत शर्मा आणि अजिंक्य रहाणे भोपळाही न फोडता तंबूत परतले आणि लगेचच सुरैश रैनाही आऊट झाल्याने भारताची परिस्थिती बिकट झाली होती. 8 धावांवर भारताचे 3 गडी बाद झाले होते. मात्र विराट कोहली आणि युवराज सिंगने डाव संभाळत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. दोघांनी केलेल्या खेळीच्या आधारे भारताने हा सामना जिंकला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार धोनीने गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने काहींनीआश्चर्य व्यक्त केले होते. मात्र सामना सुरु झाल्यानंतर भारतीय संघाने धोनीचा निर्णय़ सार्थ ठरवत आपली गोलंदाजीची झलक दाखवून दिली.  भारताने पाकिस्तानचा निम्मा संघ 35 धावांत गारद केला. अनेक दिवसानंतर झालेल्या या भारत - पाकिस्तान सामन्यात भारताने आपल्या गोलंदाजीने पाकिस्तानी टीमचा अक्षरक्ष धुव्वा उडवला. हार्दीक पांड्याने चमकदार कामगिरी करत 8 धावांवर 3 विकेट्स घेतल्या. रवींद्र जाडेजाने 2, युवराज सिंग आणि आशिष नेहराने प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या.

Post a Comment

Random Post

 
Top