दुष्काळात मल्चिंगचा वापर ठरला पिकांना वरदान
-अलीकडील वर्षांत, त्यातही प्रामुख्याने मागील वर्षी महाराष्ट्रातील विविध भागांत दुष्काळाची तीव्रता भयंकर जाणवली. तरीहीपाण्याची अधिकाधिक बचत करण्याचे उपाय वापरून शेतकऱ्यांनी आपली पिके जगवण्याचा प्रयत्न केला. त्यात जैविक तसेच पॉलिमल्चिंगचा (प्लॅस्टिक पेपर) वापर अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्यातील काही निवडक प्रयोग. येत्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांनाया प्रयोगांची प्रेरणा उपयोगी ठरणार आहे.वासुदेव काठे यांचा द्राक्ष बागेत प्रयोगनाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे येथील प्रयोगशील शेतकरी व श्री. अ. दाभोळकर प्रयोग परिवाराचे समन्वयक वासुदेव काठे यांनी दुष्काळजन्य स्थितीत पाण्याची बचत करणारे विविध प्रयोग आपल्या द्राक्ष बागेत केले आहेत. अलीकडील वर्षात द्राक्ष पिकाला दुष्काळी परिस्थितीचा गंभीर सामना करावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते म्हणतात, की जेथे पाणी अजिबात उपलब्ध नाही तेथेछाटणी न करता बाग फक्त जिवंत कशी राहील असा विचार करावा लागेल. अशावेळी बागेत गवत उगवले असेल तर वरंब्यावर त्याचे मल्चिंगकरावे.काठे यांचे प्रयोग त्यांच्याच शब्दांत.बाष्पीभवनावाटे वाया जाणाऱ्या पाण्याची बचत1) सेंद्रिय आच्छादन : दुष्काळात सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करण्यासाठी साखर कारखान्यातील बगॅस आदींचे आच्छादन फायदेशीर ठरते. बागेत वाढलेले गवत कापून वरंब्यावर आच्छादनाकरिता वापरावे. द्राक्ष बाग छाटणीपूर्वी बागेवर प्रति 200 लिटर पाण्यास 750 ग्रॅम मोरचूद + 600 ग्रॅम चुना असे बोर्डो मिश्रण तयार करून त्यामध्ये प्रति एक लिटर पाण्यास दीड ग्रॅम वेटेबल सल्फर (80 डब्ल्यूडीजी) एकत्र करून गच्च फवारावे. त्यामुळे पानांवरील, काडीवरील डाऊनी, भुरी व काही कीटकांच्या अळ्यांचा नाश होईल. यानंतर छाटणीत पडलेल्या काड्यांचे वरंब्यावर आच्छादन करावे.2) प्लॅस्टिक मल्चिंग : आमच्या प्रयोगांतून लक्षात आले की विविध जमिनींत 40 ते 60 टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत प्लॅस्टिक मल्चिंगमुळे होते.प्लॅस्टिक मल्चिंग पद्धती1) द्राक्ष बागेत बहुतांशी ठिबक सिंचनाच्या लॅटरल वरंब्यावरती अडीच- तीन फुटांवर बांधलेल्या असतात. तेथून वरंब्यावर पाणी पडून पसरत असते. अशावेळी प्लॅस्टिक मल्चिंग करताना ठिबकचे जमिनीवर जेथे पाणी पडते तेथे नऊ इंचाचे प्लॅस्टिकचे गोल छिद्र कापून घ्यावे. खबरदारी म्हणजे छिद्र पाडलेल्या ठिकाणी पाणी सतत पडून तेथील माती प्लॅस्टिकला लागून घट्ट होते. त्यामुळे काही प्रमाणात पाणी प्लॅस्टिकवरून वाहून जाते. त्यामुळे पाण्याच्या दर दुसऱ्या ते तिसऱ्या पाळीला मातीत घट्ट झालेले प्लॅस्टिक हाताने मोकळे करून घ्यावे. म्हणजे प्लॅस्टिक मल्चिंगचा पुरेपूर वापर होतो.2) अन्य पद्धत : यात ठिबक सिंचनाची लॅटरल वरंब्यावर ठेवून संपूर्ण वरंबा प्लॅस्टिकला छिद्र न पाडता झाकून घेतला जातो. साधारण चार फूट रुंद प्लॅस्टिक मल्चिंग करून कडेने झाकले पाहिजे. प्लॅस्टिक मल्चिंग पेपरवर एक ते दीड इंच माती दोन्ही प्रकारच्या मल्चिंग पद्धतींत टाकली पाहिजे. म्हणजे पेपर तापत नाही व बाष्पीभवन कमी होते. प्लॅस्टिक मल्चिंग पेपर तापला नाही तर त्याखाली भरपूर प्रमाणात पांढऱ्या मुळ्या तयार होतात. त्यामुळे अत्यंत कमी पाण्यातही वेलीची वाढ जोमदार होते.महत्त्वाच्या टिप्स1) पाणी कमी असल्यावर बरेच शेतकरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अर्धा तास पाणी देतात. याप्रमाणे पाणी दिल्यावर बागेस सेंद्रिय किंवा प्लॅस्टिक मल्चिंग नसेल, तर दिलेल्या पाण्यापैकी 50 ते 60 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते. कसबे सुकणे(ता. निफाड) येथील आनंद तिडके यांच्याकडील प्रयोगात (2009) दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी देत असलेले पाणी एकत्र करूनतेवढेच पाणी दर सात दिवसांनी दिले. त्यामुळे बागेस पाण्याचा ताण न जाणवता ती कमी पाण्यात जोमदार राहिली. कारण दर दुसऱ्या दिवशी पाणी देण्याच्या पद्धतीत दिलेल्या पाण्यापैकी 50 टक्के हे मुळांच्या कक्षेत जमिनीच्या पृष्ठभागापासून दोन ते सहाइंचात न जाता वरच्या वर राहते. त्यातील अधिकाधिक पाण्याचे बाष्पीभवन होते. सात दिवसांनी एकत्र करून दिलेले पाणी दोन ते सहा इंच खोलीत जाते. एकावेळेस जादा पाणी दिल्याने ते जमिनीत पसरून जास्त मुळांना मिळते व त्याचा फायदा होतो. दर सात दिवसांनी पाणी देण्याबरोबर मल्चिंग असेल, तर पाण्याची बचत अत्यंत चांगली होते व बागही जोमदार राहते असे माझ्याकडील सातत्याने तीन वर्षे केलेल्या प्रयोगांत लक्षात आले.प्लॅस्टिक मल्चिंगच्या बागेत ठिबक व्यवस्थापनप्लॅस्टिक मल्चिंग केलेल्या बागेत ठिबक सिंचन व्यवस्थापन काळजीपूर्वक करावे. कारण ठिबकचे लॅटरल, ड्रीपर जर प्लॅस्टिक मल्चिंगखाली झाकले असेल तर ते डोळ्यांना दिसत नसल्याने ड्रीपर बंद किंवा सुरू आहे हे समजत नाही. ड्रीपर बंद पडणार नाही यासाठी काळजी घ्यावी लागते. अशावेळी पुढील काळजी घ्यावी -1) बागेला देत असलेले पाणी शक्यतो गढूळ नसावे किंवा कचरा विरहित असावे.2) ठिबक संचाचा सॅण्ड फिल्टर गरजेनुसार पाण्याच्या दोन ते चार पाळ्यांनंतर तर स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टर गरजेनुसार पाण्याच्या दोन ते तीन पाळ्यांनंतर साफ करावा.4) पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असल्यास महिन्यातून एक वेळेस ऍसिड ट्रीटमेंट ठिबक संचास करावी. क्षार जास्त नसतील तर किमान तीन महिन्यांनी ही ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे. सर्वसाधारण परिस्थितीत ठिबक सिंचनाने ड्रीपर मल्चिंगखाली झाकलेले नसतील तेव्हा सहा महिने, वर्षातून एकदा ठिबक संचास ही ट्रीटमेंट करावी.5) दर 15 दिवसांनी पीव्हीसी पाइपमधील साचलेली गाळमाती एण्डकॅप उघडून काढून द्यावी.महत्त्वाचा मुद्दाकाळ्या जमिनीत प्लॅस्टिक मल्चिंग केल्यास 40 टक्क्यांपर्यंत, तर मुरमाड जमिनीत 50 टक्के ते अधिक पाणी बचत होते. काळ्या जमिनीत पाणी खोल जाते, त्यामुळे बाष्पीभवनाने पाणी कमी उडून जाते. मुरमाड जमिनीत पाणी कमी खोल जिरते व पृष्ठभागावरपसरते. त्याचे बाष्पीभवन जास्त होते. मुरमाड जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन प्लॅस्टिक मल्चिंगने मोठ्या प्रमाणात कमी होऊन पाण्याची बचत काळ्या जमिनीपेक्षा जास्त होते.उसाला मिळाला आधारसांगली जिल्ह्यातील पानमळेवाडी (ता. तासगाव) येथील कुलदीप पाटील यांचे मागील वर्षी लावण व खोडवा धरून सुमारे 12 एकर ऊसक्षेत्र होते. द्राक्षाच्या टापूत त्यांचे ऊस पीक पथदर्शक होते. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने ऊस अडचणीत आला. विहिरी कोरड्या पडल्या. संपूर्ण क्षेत्राला ठिबक असल्याने त्यांनी पाणी मोजून दिले. मात्र जमिनीत ओलावा टिकून राहावा यासाठी उसातपाचटाचे मल्चिंग केले. महिना ते सव्वा महिन्यापर्यंत त्याचा परिणाम राहतो.सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांत तर पिण्याचेही पाणी उपलब्ध नव्हते. या भागात जिद्दीने द्राक्ष बागा फुलवणारे बागायतदार आहेत. येथे पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसलेले शेतकरी आहेत. सन 2011 मध्ये भरून ठेवलेल्या शेततळ्याच्या माध्यमातून द्राक्ष बागा जगवण्याचे नियोजन त्यांनी मागील खरिपात केले. सोनलगी (ता. जत) येथील विठ्ठल बिराजदार व त्यांच्या भावांची मिळून वीस एकर द्राक्ष क्षेत्र मागील वर्षी होते. दुष्काळी परिस्थिती गृहीत धरून मागील जानेवारीतच उसाचा पाला गोळा करून संपूर्ण बागेत पसरून घेतला. जमिनीतील ओल कायम राहावी असा प्रयत्न केला. या मल्चिंगचा दुष्काळात आधार झाल्याचे ते म्हणाले.याच भागातील रोहिदास सातपुते यांनीही आपल्या द्राक्ष बागेला पाल्याच्या मल्चिंगचा आधार शोधला. मल्चिंगमुळे प्रतिकूल परिस्थितीत ओलावा जास्त दिवस टिकून राहिला व पांढऱ्या मुळ्या सुटण्यास मदत झाली.वेलंग (जि. सातारा) येथील शेखर पाटणे यांचा भाग कमी पावसाचा आहे. त्यांच्या गटशेतीच्या माध्यमातून सदस्य शेतकऱ्यांनी गेल्या सात- आठ वर्षांपासून पट्टा पद्धत आणि पाचटाच्या आच्छादनावर भर दिला आहे. मागील वर्षी पावसाने चांगलाच ताण दिला. अशावेळी पाचट आच्छादनामुळे पाटपाण्यावरील उसाला 20 दिवसांनी पाणी दिले. जोड ओळ लागवड असल्याने एकाच सरीत पाणी दिले जाते. जेथे ठिबक सिंचन आहे तेथे दर चार दिवसांनी केवळ चार तास ठिबकने पाणी देतो. वेलंग गावातील बहुतांश शेतकऱ्यांना पाचटाचे महत्त्व पटले आहे.आष्टा (जि. सांगली) येथील प्रयोगशील ऊस उत्पादक संजीव माने यांनीही खोडव्यात पाचटाचे आच्छादन करून जमिनीत गारवा टिकवला. लावणीच्या उसाचे खालचे पाचट मुद्दाम काढले नाही, त्यामुळे उसातून होणारे बाष्पीभवन काही प्रमाणात थांबले.जे. बी. पाटील हे गोटखिंडी (जि. सांगली) येथील प्रयोगशील शेतकरी. गेल्या काही वर्षांपासून ते पाचट जमिनीत कुजवीत असल्याने जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण चांगले वाढले असून, पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमताही वाढली आहे. त्यामुळेपावसाचा ताण पडला तरी जमिनीतील टिकलेल्या ओलाव्याचा पिकाला फायदा झाला आहे.तणांचे मल्चिंग फायदेशीरकोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांनीही मल्चिंगबाबत अनेक प्रयोग केले आहेत. त्यांनी राबविलेल्याशून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर विदर्भातील राजेश पाटील यांनी आपल्या कापूस पिकात केला. एक पट्टा पिकांचा आणि एक पट्टा तणांचा घेऊन त्यांनी दुष्काळी परिस्थितीतही चांगल्या प्रकारे पीक जगवण्याचा प्रयत्न केला. एका पट्ट्यात तणे वाढवायची, फुलोऱ्यावर येण्यापूर्वी ती जमिनीलगत कापायची असा हा प्रयोग होता. तणांचे मल्चिंग केल्याने भूपृष्ठावर ओलावा टिकवून ठेवलाजातो. तणांच्या मुळ्या जमिनीत राहिल्याने जमीन भुसभुशीत राहते. पुढे तण कुजल्याने त्याचे खत तयार होते. पिकाला त्याचा फायदा होतो. कोल्हापूर जिल्ह्यात विविध भागांतील शेतकरी हा प्रयोग करीत आहेत.चिपळूणकर म्हणतात, की विदर्भातील काही शेतकरी तूर- सोयाबीन, कापूस-सोयाबीन, कापूस-तूर, तूर- मूग किंवा उडीद अशी मिश्र पीकपद्धती वापरतात. या पद्धतीमुळे मुख्य पिकास पाण्याचा ताण सहन करावा लागतो. काही वेळेला मुख्य पिके वाया जाण्याचाही धोका असतो. यासाठी मिश्रपीक घेण्याऐवजी मुख्य पिकामध्ये तणांचा पट्टा वाढविण्याचे प्रयोग सुरू आहेत. ही तणे फुलोऱ्यावर येण्यापूर्वी त्यांचा वापर मल्चिंगसाठी हिरवळीच्या खतांबरोबर करता येतो. त्यातून पाण्याची बचत केली जाते. द्राक्ष, डाळिंबाच्या बागांतही असे प्रयोग सुरू आहेत. त्यात बागांमधील आंतरमशागत बंद केली आहे. तणे वाढवायची व फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच ब्रश कटरने जमिनीलगत कापून त्याचे आच्छादन केले जाते. तणांच्या मुळांना धक्का द्यायचा नाही. यामुळे बागांमध्ये आंतरमशागतीसाठी केल्या जाणाऱ्या खर्चातही बचत होते व पिकास सेंद्रिय खतही उपलब्ध होते. सेंद्रिय खतामुळे जमिनीतील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. पाण्याची कमतरता भासणाऱ्या भागात असे प्रयोग होणे गरजेचे आहे.जळगाव जिल्ह्यातील लोहारा येथील प्रयोगशील सेंद्रिय उत्पादक विश्वासराव पाटील गेल्या अनेक वर्षांपासून किफायतशीर व प्रायोगिक शेती करीत आहेत. त्यांच्या शेतीतील व्यवस्थापनात पीक फेरपालट, चौरस पीक पद्धती, आंतरपिके, मिश्रपिके, सापळा पीकपद्धती, वाफसा अवस्था, आच्छादन वापर, हिरवळीची खते यांचा समावेश असतो. शेतातील बांधावर वाढणाऱ्या गवताचे आच्छादन केले तर जमिनीची धूप थांबून बाष्पीभवन रोखण्यास मदत होईल असे ते म्हणतात. शेतात तयार होणारे सेंद्रिय कर्ब म्हणजे काडी-कचरा, उसाचे पाचट आदींचा वापर आच्छादनासाठी करावा. पीक काढणीनंतर पिकाचा उरलेला प्रत्येक अवशेष उपयोगात आणता येऊ शकतो.शिवणी (जि.जालना) येथील उद्धव खेडेकर अभ्यासू शेतकरी आहेत. पाण्याची परिस्थिती पाहून उन्हाळी भाजीपाला, शेडनेटमध्ये काकडी, ढोबळी मिरची असे त्यांचे नियोजन असते. शेततळ्यातील पाण्यावर उन्हाळी विशेषतः शेडनेटमध्ये ढोबळी मिरची व काकडी घेतली जाते. शेडनेटमध्ये पॉलिमल्चिंग पद्धतीचा वापर करतात, मात्र प्रत्येक पिकातच पॉली वा जैविक मल्चिंगचा वापर करून पाण्याची बचत त्यांनी साधली आहे.पंढरपूर तालुक्यातील (जि. सोलापूर) आढीव येथील प्रगतिशील शेतकरी भारत रानरुई यांची सुमारे 35 एकर शेती असून त्यात द्राक्षे, ऊस, केळी, डाळिंब, आंबा आदी पिके असतात. यंदाच्या दुष्काळात सात एकरांपैकी केवळ दोन एकर ऊस त्यांनी पट्टा पद्धतीने ठेवला व त्यात पाचट ठेवले. सात एकरांपैकी खोडव्याची चार एकर केळी सोडून दिल्यानंतर उर्वरित केळीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. केळीच्या सर्व क्षेत्रात पडणाऱ्या पानांचे मल्चिंग करायचे होते, मात्र पाने कमी पडल्याने एक आड एक सरी मल्चिंग केले. डाळिंब बागेसाठी लाकडाच्या वखारीतून लाकडी भुसा विकत आणून डी- कंपोस्टिंग कल्चर व शेणाची स्लरी टाकून 21दिवस कुजवून त्याचे मल्चिंग केले. आंब्याच्या बागेतही ते मशागत करत नाहीत. त्यामुळे पालापाचोळा, काड्यांचा शेतात थर तयार झाला आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी राहतो.डाळिंबात मल्चिंग पेपरचा वापर फायदेशीरपाण्याची उपलब्धता चांगली असतानाही पाण्याचा अपव्यय न होता त्याचा काटेकोर वापर व्हावा यासाठी अनेक शेतकरी मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर करतात. सोलापूर जिल्ह्यातील कुसळंब (ता. बार्शी) येथील अरुण व अशोक शिंदे या बंधूंनी आपल्या शेतातील बहुतेक सर्व पिकांसाठी "मल्चिंग पेपर'चा वापर करण्याचा प्रयोग पूर्वी केला आहे. या पद्धतीतून त्यांनी मशागतीचा खर्च वाचवलाच शिवाय पाण्याची मोठी बचत केली.पपई, केळी, खरबूज, कलिंगड अशा पिकांमध्ये मल्चिंगचा मुख्यतः वापर होतो. मात्र शिंदे बंधूंनी डाळिंबासह केळी, द्राक्ष, कलिंगड अशा बहुतांश पिकांना मल्चिंगचा वापर केला. त्यांच्या अनुभवानुसार मल्चिंग पेपरमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची पन्नास टक्क्यांपर्यंत बचत झाली. झाडांच्या पोषकतेला फायदेशीर ठरणारी पांढरी मुळी सशक्त राहते. झाडाच्या चोहोबाजूंनी पेपर अंथरल्याने खुरपणीचा खर्चही वाचतो. अलीकडील वर्षात डाळिंब उत्पादकांना मर, सूत्रकृमी आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. डाळिंबात मल्चिंग केल्याने सूत्रकृमीवर नियंत्रण ठेवणेही शक्य होऊ शकेल, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.पॉलिमल्चिंग पेपरचा वापर फायदेशीर कसा?1) जमिनीचे तापमान व आर्द्रता अनुकूल राहून पांढऱ्या मुळींची उत्तम वाढ होते.2) बाष्पीभवन कमी होते.3) प्रकाश परावर्तन करत असल्यामुळे पिकांवर येणाऱ्या रसशोषक किडींवर नियंत्रण मिळवता येते.4) सूर्यप्रकाश जमिनीवर पोचत नसल्याने तण उगवण्यास अटकाव होतो.5) जमीन वाफशावर राहिल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.केळीच्या मोकळ्या पट्ट्यात पालापाचोळ्याचे आच्छादनदुष्काळी परिस्थितीत अत्यल्प व उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून रोपळे बु. (जि. सोलापूर) येथील प्रताप बिस्किटे यांनी केळीची बाग चांगल्या प्रकारे जोपासली आहे. बागेतील मोकळ्या पट्ट्यात पालापाचोळ्याचे आच्छादन केले. गांडूळ खत निर्मितीचा प्रयोगही केला.रोपळे भागातील शेतकऱ्यांना यंदा दुष्काळाच्या तीव्र झळा बसल्या. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून गेली.बिस्किटे यांचे मागील वर्षी चार एकर केळीचे क्षेत्र होते. मागील वर्षी मार्च- एप्रिल महिन्यात त्यांना पाणीटंचाईने घेरले.केळी बागेला पाणीटंचाईची झळ बसू लागली. जुन्या विहिरीचे थोडे पाणी उपलब्ध झाले. पुन्हा मेमधील कडक उन्हाळ्यामुळे हे पाणी कमी झाले. दररोज शेतात स्वतः उभे राहून ठिबक सिंचनाने पाणी देऊनही पाणी कमी पडू लागले. त्या वेळी नवीन बोअर घेऊन त्यातील पाणी विहिरीत घेणे व ते ठिबक सिंचनाने बागेला देणे सुरू होते.बागेत गांडूळ खत निर्मितीया परिस्थितीत नियोजन करताना वाळलेला पाला, केळीच्या खुंटाचे वाळलेले सोपट काढून ते बागेतील लागवडीच्या मोकळ्या पट्ट्यात समान पद्धतीने पसरले. त्यात तीन ते चार दिवसांनी पाणी सोडले. यामुळे पाल्याखाली ओलावा तयार झाला. एका कृषी प्रदर्शनातून त्यांनी गांडूळ कल्चर आणले होते. त्याच्या वापरामुळे बागेत गांडूळ संवर्धन झाले. यामुळे चांगले सेंद्रिय खत तयार होऊ लागले.योग्य व्यवस्थापनातून केळी फुलली. विक्रीच्या सुरवातीच्या टप्प्यात व्यापाऱ्याला जागेवरच तीन टप्प्यांत व तीन दरांमध्ये म्हणजे प्रति किलो नऊ, साडेनऊ व पावणेदहा असे दर बिस्किटे यांच्या केळीला मिळाले. बागेत सुमारे 25 किलोपासून 35 किलोवजनाचे घड तयार झाले. उत्पादनाची गुणवत्ता चांगली असल्याने शेजारच्या केळी उत्पादकाला ज्या वेळी किलोला साडेसात रुपये दर मिळत होता, त्या वेळी बिस्किटे यांच्या बागेतील केळींना तो नऊ रुपये मिळाला होता.दुष्काळी आटपाडी तालुक्यात सात एकरांत ढोबळी मिरचीसांगली जिल्ह्यातील आटपाडी हा कायम दुष्काळी तालुका. प्रतिकूल परिस्थितीमुळे येथील अनेकांना गावे सोडण्याची वेळ आली. मात्र, तालुक्यातील घरनिकी येथील सुरेश बेरगळ या युवा शेतकऱ्याने विलक्षण जिद्दीने शेती फुलवली आहे. पाणी उपलब्ध त्या सर्व स्रोतांतून अक्षरशः संकलित करून त्यांनी तब्बल सात एकर ढोबळी मिरचीचे पीक आटपाडीच्या वाळवंटसदृश भागात मागील वर्षी घेतले. दोन वर्षांपूर्वीही त्यांनी ढोबळी मिरची घेतली होती. मागील वर्षीही परिस्थिती अनुकूल राहील या भरवशावर पिकाचे नियोजन केले. जुलैला पाऊस पडेल या अपेक्षेतून एप्रिलमध्ये लागवड केली. पाण्याची बचत करण्यासाठी पॉलिमल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर केला. पाण्याच्या काटेकोर बचतीतून ढोबळी मिरची फुलवली.सुरवातीच्या पाच तोड्यांना प्रति किलो सरासरी चौदा रुपये भावही मिळाला. अर्थात, उत्पादनापेक्षा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे पीक पॉलिमल्चिंग वा ठिबक सिंचन अशा विविध उपायांनी जगवणे हीच गोष्ट या प्रयोगात महत्त्वाची ठरली.Source : Agrowon..
Post a Comment