0

मुंबई :सरकार अस्थिर करण्यासाठी आणि माझ्या बदनामीसाठी अनेकजण षडयंत्ररचत असल्याच्या पंतप्रधानांच्या आरोपाविरोधात मित्रपक्ष शिवसेनेतूनच आवाज उठत आहे. ‘सध्याच्या घटना पाहता देश स्थिर राहील काय? आम्हाला चिंता देशाच्या स्थैर्याची आहे’ असा टोला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून हाणला आहे.सरकारे येतात व सरकारे जातात, देश टिकू द्या! असं सामनामध्ये म्हटलं आहे. ‘मला बदनाम करण्याचा आणि एनडीए सरकार अस्थिर करण्याचा डाव काही असंतुष्ट स्वयंसेवी संस्था आणि काळाबाजार करणारे लोक आखत आहेत, पण अशा कारस्थानांपुढे मी झुकणार नाही!” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंहोतं.‘मोदी यांचे म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे. मोदी हे पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफ यांच्याबरोबर चहापान करून आल्यापासून ही कारस्थाने प्रकर्षाने जाणवत आहेत. मोदी हे चांगल्या मनाने, दिलदारीने शेजारधर्म म्हणून शरीफ यांच्या घरी गेले, पण शेवटी ‘पठाणकोट’ हल्ला घडवून पाकिस्तानने मोदी यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा तो खुपसलाच. पठाणकोटवरील हल्ला हादेखील मोदी सरकारला बदनाम व अस्थिर करण्याचाच डाव असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. ”मोदी हे शरीफ यांना भेटले तेव्हा तिथे दाऊद इब्राहिम हजर होता” हा बदनामी बॉम्ब आझम खान यांनी टाकला हा त्याचकटाचा एक भाग असावा’ अशा कानपिचक्या सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आल्या आहेत.एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, ही बाबच अनेकजण अद्याप पचवू शकत नाहीत.त्यामुळेच हे सरकार पाडण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप मोदींनी केला होता.

Post a Comment

Random Post

 
Top