मुंबई :शुभ आणि अशुभचं गणित राज्य सरकारच्या डोक्यातून जात नाही याचीचप्रचिती आली आहे. कारण राज्याच्या अर्थसंकल्पाची तारीख ठरली असताना, त्या तारखेची बेरीज अशुभ अंक येत असल्याचं मानत ही तारीख पुढे ढकलण्यातआली.राज्याचा अर्थसंकल्प 17 मार्चला सादर करण्याचं आजच्या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र 17 चा खतरा टाळून ही तारीख 18 करण्यात आली. यासाठी वरीष्ठ मंत्र्यांनी अनोखं लॉजिक लावलं. 18 म्हणजे 1+8 = 9 हा शुभ अंक येत असल्याचं मानत, याच तारखेला अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ठरलेली17 मार्चची तारीख ऐनवेळी बदलून 18 तारीख निश्चित करण्यात आली.दरम्यान, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 मार्च ते 13 एप्रिल 2016 यादरम्यान असेल. तर 21 मार्चला अर्थसंकल्पावर चर्चा होणारआहे.विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment