पिंपरी-चिंचवड:पिंपरी-चिंचवडमध्ये कुदळवाडी इथं दुपारी लागलेल्या भीषण आगीत भंगार मालाची दुकानं आणि लाकडाची वखार जळून भस्मसात झाली.शहरातील महापालिकेचं तसेच खासगी कंपन्यांच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.भंगार मालाची दुकानं आणि लाकडाची वखार शेजारी-शेजारी असल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.आगीमुळे धुराचे प्रचंड लोळ उसळल्यानं आकाश झाकोळून गेलंय. घटनास्थळी बघ्यांच्या गर्दीमुळे आग विझवण्यात अडचण निर्माण झाल्यानं पोलिसांना गर्दी हटविण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. यामुळे बघ्यांमध्ये आणि पोलिसांमध्येही यावेळी बाचाबाची झालीय.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment