0

पाटणा, दि. १ - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव पुन्हा एकदाआपल्या बेधडकवक्तव्यामुळेचर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमात बोलतानालालूप्रसाद यादवयांनी स्वमूत्र हे डेटॉलचं काम करतं असं सांगत हशा मिळवला आहे.ते म्हणाले, की डेटॉल ही आधुनिक युगाची देण आहे. आमच्या लहानपणी कुठं डेटॉल होतं. त्यावेळी तर औषधं पण नसायची. शरीराच्या कुठल्याही भागाला जखम झाली की मूत्रविसर्जन करून टाकायचो, जे औषधाचं काम करायचं.हल्लीच्या पिढीला काही माहिती नाही अशी पुस्ती जोडताना जखमा ब-या करण्याचा हा सगळ्यात सोपा उपाय असल्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. जखमेवर मूत्रविसर्जन केलं की किटाणू राहत नाहीत असं त्यांनी म्हटलंय.

Post a Comment

Random Post

 
Top