आरसीएफ' आणि "एसआयएलसी'च्या वतीने मोफत प्रशिक्षणपुणेः "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर' (एसआयएलसी) आणि "राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.(आरसीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात १६ मार्च रोजी "भरघोस उत्पादनवाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये, विद्राव्य खतांच्या वापराचे महत्त्व' या विषयी एकदिवसीय मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे.पिकाच्या दमदार उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा तसेच विद्राव्य (पाण्यात विरघळणारी) खतांचा वापर अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र या दोन्हींविषयी जागरूकता नसल्याने अपेक्षित उत्पादन मिळत नाही. कार्यशाळेत पिकांना कोणकोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते, त्यांच्या वापराचे फायदे, कमतरतेमुळे पिकावर होणारे परिणाम, विद्राव्य खतांच्या वापरामुळे उत्पादनवाढीत होणारे फायदे, त्यांचा वापर कसा करावा इ.विषयी डॉ. हरिहर कौसडीकर तसेच आरसीएफचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. सकाळनगर, बाणेर रोड, पुणे येथे कार्यशाळा होईल. आगाऊ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी संपर्क - ८६०५६९९००७
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment