0

हेडलाईन्स:

1. श्रीहरी अणेंच्या वेगळ्या विदर्भ-मराठवाड्याच्या वक्तव्यानं राजकारण पेटलं

————————————–

2. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर महिंद्रा एसयूव्ही कारचा टायर फुटल्यानं अपघात, 2 ठार तर 8 जण जखमी

————————————–

3. देवनारच्या कचऱ्याला लागलेल्या आगीनं मुंबईवर काजळी, नवी मुंबईसह उपनगरं धुरकटली, विरोधकांना घातपाताचा संशय

————————————–

4. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळांची 55 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त, तर समीर भुजबळांच्या कोठडीत 31 मार्चपर्यंत वाढ

————————————–

5. जिद्दी सुनीताताईंच्या मदतीला धावले संवेदनशील हात, दोन दिवसात साडेचार लाखाची मदत, माझाच्या बातमीचा परिणाम

————————————–

6. घटनेच्या चौकटीनं दिलेल्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, मोदींचं आश्वासन, 125व्या जयंती कार्यक्रमात आंबेडकरांचं गुणगान

————————————–

7. आयफोनच्या स्पेशल एडिशनचं लाँचिंग, तरुणाईसाठी खास आकर्षण, तर आयफोन 5S निम्म्या किंमतीवर येणार

————————————–

8. विश्वचषकानंतर पाकच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघाच्या कर्णधारपदावरून आफ्रिदीची हकालपट्टी निश्चित, पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांची माहिती

————————————–

9. राष्ट्रगीत लांबवल्यानं महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार दाखल, 52 सेकंदाच्या राष्ट्रगीताला लावले 1 मिनिट 22 सेकंद

————————————–

10. नागराज मंजुळेच्या बहुचर्चित सैराट सिनेमाचं नवं गाण रिलिज, झिंगाटच्या ठेक्यावर रसिकांच्या उड्या

Post a Comment

Random Post

 
Top