हेडलाईन्स 25
1. बेल्जियमच्या ब्रसेल्मध्ये अडकलेले भारतीय जेट विमानाने दिल्ली विमानतळावर दाखल, तर हल्ल्यातील जखमी निधी चाफेकर कोमात, पीटीआयचं वृत
2.बाळासाहेब ठाकरेंच्या हत्येचा कट रचला होता, उलटतपासणीत हेडलीची जाहीर कबुली, तत्कालीन सरकार, पोलिसांनी माहिती लपवल्याने गोंधळ
3. लातूरला रेल्वेनं पाणी पुरवण्यासाठी चाचपणी सुरु, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची माहिती, भीषण पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी उपाय
4. निलंग्यामध्ये विनापरवाना उभारण्यात आलेला महाराजांचा पुतळा हटवला, गावकऱ्यांचा पोलिसांना तीव्र विरोध, गावात कडेकोट बंदोबस्त
5. पीडीपीला सत्ता मिळाल्यास मेहबूबा मुफ्ती होणार काश्मिरच्या मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत मेहबूबांच्या नावावर शिक्कामोर्तब
6. पंतप्रधान मोदींनी अरविंद केजरीवालांना ट्विटरवर फॉलो केलं, केजरीवालांकडून मोदींचे आभार, दिल्लीसाठी एकत्र काम करण्याचं आवाहन
7. कन्हैया कुमारवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न, हैदराबादमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घटना, दोन तरुणांना अटक
8. देशभरात उत्साहात धुळवड साजरी, ऐन दुष्काळात महाराष्ट्रवासियांची संवेदनशीलता कौतुकास्पद, ‘माझा’च्या आवाहनाला मोठा प्रतिसाद
9. पाकिस्तानात धुलिवंदनच्या सेलिब्रेशनला गालबोट, विषारी दारूमुळे 45 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 35 हिंदूंचा समावेश, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
10 अर्जेंटिनात दिलखुलास बराक ओबामांच्या नव्या गुणाचं दर्शन, टँगो डान्स करुन उपस्थितांना आश्चर्याचा धक्का
Post a Comment