✡✡नमस्कार एक नजर दिवसभरात घडलेल्या बातम्यांवर ✡✡
♐04:02PM- सीएसटीच्या सेंट्रल रेल्वेच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी, रोजच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी, रेल्वेच्या कार्यालयाबाहेर मनसेचंहीआंदोलन
♐03:47PM- वर्धा- संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर पुलगावात दाखल, घटनास्थळाचा घेणार आढावा
♐03:39PM- नाशिक-मुंबई महामार्गावर मुंढेगाव शिवारात रस्ता ओलांडताना मुंबईतल्या कांदिवलीत राहणा-या प्रसादभाई दामोधर पारेख (68) जागीच ठार
♐03:26PM- चौंडी येथे धनगर मेळाव्याला महादेव जानकर यांची अनुपस्थिती, विविध पक्षांचे 11 आमदार उपस्थित
♐03:22PM- उत्तर अफगाणिस्तानात तालिबानच्या दहशतवाद्यांनी 16 बसमधली प्रवाशांची केली हत्या, डझनांहून अधिक लोकांचं अपहरण केल्याचं एएफपीचं वृत्त
♐03:18PM- अहमदनगर-राज्यातील सत्तेत धनगर समाजाला न्याय दिला जाईल. अहिल्यादेवी होळकरांची जयंती चौंडी येथेच साजरी होईल, असे ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडेंनी महादेव जानकरांचे नाव न घेता सांगितले
♐03:05PM - सोलापूर शहरात जुगार अड्ड्यावर छापा, 9 जण अटकेत, जुगार साहित्य जप्त. गुन्हे शाखेची कारवाई.
♐02:44PM - अहमदनगर - अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समारंभ चौंडी (ता. जामखेड) येथे सुरू, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांचा दौरा रद्द, त्यांच्याऐवजी राजस्थानचे उद्योगमंत्री गजेंद्रसिंह यांची उपस्थिती. धनगर समाजाच्या सहा आमदारांची हजेरी. गृहराजयमंत्री राम शिंदे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन.
♐02:32PM - विक्रोळी पश्चिमेकडील सुर्यानगरमध्ये लागली आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी.
♐02:29PM - अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाने आझाद मैदानात धनगर मेळावा आयोजित केला आहे, राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत, विधानसभा निवडणुकीत भाजपाला महादेव जानकर यांनी साथ दिली होतीमात्र भाजपने अद्यापपर्यंत आश्वासनांची पूर्तता केलेली नाही, त्यामुळे या मेळाव्यात जानकर काय भूमिका घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे, दुपारी एक वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात गर्दी केली आहे.
♐01:50PM- अगुस्ता वेस्टलँड घोटाळा प्रकरणी सीबीआय प्रमुख अनिल सिन्हा यांचाजबाब घेतला जाणार नसल्याची सुत्रांची माहिती.
♐01:46PM - बँकेच्या कर्ज थकबाकी प्रकरणात ईडीने एका हिरे कंपनीची १७२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
♐01:00PM - पी चिदंबरम यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज.
♐12:39PM - काँग्रेसमुक्त भारतचा अर्थ काय ? हादेखील एक कट आहे, रोज कारण देतात, चुकीचे आरोप लावतात - सोनिया गांधी यांचं रॉबर्ट वढेरा प्रकरणावर वक्तव्य.
♐12:36PM - तालिबानने उत्तर अफगाणिस्तानमध्ये 16 बस प्रवाशांची केली हत्या- एएफपीचं वृत्त.
♐12:29PM - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आजचा वर्ध्यात पुलगाव येथे दुर्घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेणार.
♐12:23PM - मोदींनी आपण पंतप्रधान आहोत हे लक्षात ठेवावं, राजे नाही आहोत, शेतकरी आत्महत्या करत असताना 2 वर्ष पुर्ण झाल्याचा आनंद साजरा केला जातो - सोनिया गांधी.
♐12:21PM - बंगळुरु - निर्मला सीतारमन यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला.
♐12:21PM - उत्तरप्रदेश - सोनभद्र येथे अनपरा रेल्वे स्थानकावर मालगाडी घसरली, रेल्वे वाहतुकीवर परिणाम.
♐12:19PM - वडोदरा - अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यान स्थानिकांनी पोलीस आणि महापालिका कर्मचा-यांवर केली दगडफेक, वाहने पेटवून दिली.
♐11:58AM -लेफ्टनंट कर्नल आरएस पवार आणि मनोज के मनोज यांचा आगीमध्ये मृत्यू.
♐11:56AM - केंद्रीय दारूगोळा भांडाराला लागलेली आग आता नियंत्रणात आली असून, आता पर्यन्त १५ ते १६ फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्या आहेत, जखमींना सावँगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
♐11:31AM - लष्करप्रमुख पुलगाव येथे येण्यासाठी निघाले.
♐11:16AM - विधानपरिषेदसाठी भाजपा सहावी जागा लढवणार, भाजपाच्या सहाव्या जागेसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारी.
♐10:31AM - वर्धा - लष्करी दारुगोळा भांडार स्फोट प्रकरण - केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर वर्ध्याला जाण्याची शक्यता, स्फोटात दोन अधिका-यांसह 17 जणांचा मृत्यू, लेफ्टनंट कर्नल आर एस पवार आणि मेजर मनोज के यांचा मृत्यू.
♐10:16AM - वसईमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एक कोसळला, काही प्रवासी गटारात पडले.
♐09:53AM - सोलापूर - बोळकवठा (ता. दक्षिण सोलापूर ) येथे देवेंद्र रामा गायकवाड यांची निर्घूण हत्या.
♐09:53AM - गुजरात - सुरतमध्ये तापी नदीत ट्रक कोसळला, काही जण बुडाले असल्याची शक्यता, सर्च ऑपरेशन सुरु.
♐09:33PM - सोलापूर - लोकमंगल प्रतिष्ठानतर्फे महाआरोग्य शिबिर, 32 हजार रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल, राज्यातील प्रसिद्ध डॉक्टर्स सोलापूरात दाखल.
♐09:24AM - पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यु, दोन अधिका-यांचा समावेश.
♐09:10AM - २० वर्षाच्या फुटबॉलपटूच्या कानाखाली मारली म्हणून अभिनेता सूर्या विरोधात गुन्हा दाखल.
♐08:57AM - लोअर परळमध्ये एक्स्प्रेसचा डबा घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील वाहतूक पुर्णपणे बंद, चर्चगेटच्या दिशेने जाणारी वाहतूकदेखील धीम्या गतीने, वाहतूक पुर्ववत होण्यास लागणार वेळ, सकाळच्या वेळी चाकरमान्यांचे हाल.
♐08:54AM - लोअर परळ रेल्वे अपघात प्रकरणावर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू स्वत: लक्ष ठेवून आहेत, लवकराच लवकर वाहतूक पुर्वत करण्याचे पश्चिम रेल्वेला निर्देश.
♐08:35AM - पुणे गुन्हे युनिट शाखा 5 मध्ये मध्यरात्री आग, आगीत महत्वाची कागदपत्रे जळून खाक.
♐08:30AM - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव श्रवस्ती जिल्ह्यातील गाव घेणार दत्तक.
♐08:01AM - उत्तरकोरियाचा क्षेपणास्त्र चाचणीचा प्रयत्न फसल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
♐07:40AM - पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यासाठी दुपारचे बारा वाजण्याची शक्यता...
♐07:31PM - जम्मू-काश्मिरमध्ये राजौरीमधील बाबा गुलाम शहा विद्यापीठाजवळच्याजंगलात दोन दिवसापूर्वी लागलेली आग अधिकच भडकली आहे.
♐07:28PM - लोअर परेलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ यार्डात जाणा-या एक्सप्रेसचा डब्बा घसरला, प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोन वरील वाहतूक पूर्णपणे बंद.
♐07:00AM - पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोअर परळ स्टेशनजवळ बोगी रुळावरुन घसरली, धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली
♐02:38AM - वर्धा : पुलगावमध्ये भीषण आग10:48PM - पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या शस्त्रक्रियेपूर्वी पंतप्रधाननरेंद्र मोदींनी त्यांच्याशी फोनवर बातचीत केली असून त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठीशुभेच्छा दिल्या आहेत.
♐10:20PM - नाशिक - धरमपूर महामार्गावर पेठ शहरापासून ११ कि मी अंतरावर नालशेत गावाजवळ ट्रक व टँकर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही चालकांसह एक क्लिनर असे तीन जन जागीच ठार झाल्याचे वृत्त.
♐10:06PM- पश्चिम बंगालमधल्या कोना एक्स्प्रेस वेवर एका प्रायव्हेट बसची ओव्हरटेक करताना 5 कारला धडक
♐09:25PM- नायजेरियन विद्यार्थ्यांवर दिलीप परुळेकरांची टीका, काळ्या यादीतल्या लोकांना त्यांच्या देशात परत पाठवलं पाहिजे- दिलीप परुळेकर, गोवा पर्यटन मंत्री
♐09:22PM- मध्य प्रदेशमधील बरवानी जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून तेजस्वी नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
♐09:22PM- तेजस्वी नायक हे मध्य प्रदेशमधल्या बरवानी जिल्ह्याचे नवे कलेक्टर
♐09:18PM- दिल्लीत ओला कॅब चालकावर हल्ला करणा-या आफ्रिकी तरुणाला अटक
♐08:19PM - नाशिक : मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे बेमोसमि पावसाचा तडाखा; दोन पॉल्ट्री फॉर्मचे पत्रे उडाल्याचे वृत्त.
♐08:10PM - मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन जेसीबी मशीन जाळल्याची घटना घडली.
♻ताज्या बातम्याच्या खजिना मिळवा कुठेही,केव्हाही फक्त एका किल्क वर👇🏻खाली दिलेल्या लिंक वरती किल्क वरुन ॲप डाऊनलोड करा..https://play.google.com/store/apps/details?id=com.ajanale.nagari🔹किंवा फेसबुक वरती महाराष्ट्र माझा पेज लाईक करा...📞संपर्क : भुषण येलपले ७७०९४०६४९६, ७७०९४०६४९७,७२१९३२९००४, ७२१९३२९००५.
महाराष्ट्र माझाच्या व्हाट्सॲप वरती ॲड होण्यासाठी आपला नंबर ७७०९४०६४९६ ह्या नंबरवरती पाठवावा.
Post a Comment