0

🌺🌹सुप्रभात🙏🏻 🌷

🖍सकाळच्या टाॅप        हेडलाईन्सवर एक नजर...

     सोमवार १३ जून २०१६
     वेळ-  ०६ . ५० am.
-----------------------
📏📏
🎋सोलापूर : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या २0 मुलांची बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय पुण्यातील वाघोलीत करण्यात आली असून, आज (सोमवारी) सकाळी ११ वाजता ही मुले हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँम्फी थिएटरमधील सोहळ्यानंतर पुण्याला रवाना होणार आहेत. या मुलांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १५ जून रोजी पुण्यात येणार आहेत. 

📏📏
🎋सोलापूर : आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी , शहरात ५0 ठिकाणी योग शिबिरे घेऊन २१ जून रोजी साजरा होणार्‍या आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल जनजागृती करण्यात आली. 

📏📏
🎋सोलापूर : बेकायदेशीररित्या घरगुती गॅस इंधन म्हणून वाहनात भरत असताना छापा टाकून ८ हजार ३२0 रुपयांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई सिद्धेश्‍वरपेठ येथे रविवारी दुपारी करण्यात आली. 

📏📏
🎋सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश आर. के. फॅन्स असोसिएशनच्या वतीने ग्रेटमोशन राजकपूर यांना अभिवादन करण्यात आले. प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. नारायणदास चंडक यांच्या हस्ते राजकपूर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

📏📏
🎋पुणे: खडकी बाजारातील तोडफोडीप्रकरणी ९ जणांना अटक, पिंपरी-चिंचवडच्या खडकी पोलिसांची कारवाई

📏📏
🎋कोल्हापूर: काल संध्याकाळी ४.५० वाजता कोल्हापुरात ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का, वारणावतीपासून १२.८० किमी अंतरावर आहे भूकंपाचा केंद्रबिंदू

📏📏
🎋मुंबई : रितेश-जेनेलियाने आपल्या मुलाचे नाव ठेवले 'राहिल' 

📏📏
🎋कोल्हापुरातल्या र्जयसिंगपूरमध्ये डंपर-दुचाकीच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू, सांगली- कोल्हापूर महामार्गावर वाहतूक विस्कळीत

📏📏
🎋पुणे: देशात बहुसंख्य हिंदू असूनही देशात हिंदूंची मुस्कटदाबी होत आहे, देशद्रोही संघटनांना पोलिस संरक्षण देतात आणि हिंदूंनाच पकडतात- हभप श्यामजी महाराज राठोड

📏📏
🎋औरंगाबाद - जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत यंदा कामे करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची अडीच कोटींची मागणी

📏📏
🎋नागपूर: शरद गेडाम आणि बरखा शिरसाट या 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

📏📏
🎋राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तीन आफ्रिकी देशांच्या दौ-यासाठी रवाना

📏📏
🎋सायना नेहवालनं दुसऱ्यांदा जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचं जेतेपद...

📏📏
🎋ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळवणाऱ्या सायना नेहवालचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन 

📏📏
🎋मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी सायना नेहवालचे केले अभिनंदन...

||-----💫🎀💫------ ||     ✍🏻
  ----------------------

Post a Comment

Random Post

 
Top