0

एक नजर सकाळच्या हेडलाईन्सवर: 

1. मुंबईत पावसाचा जोर ओसरला, मात्र रेल्वे वाहतूक सुमारे अर्धा तास उशीराने

2. योगाला कर्मकांडाशी जोडू नका, आंतराष्ट्रीय योगदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन, उपस्थितांसह मोदीही योग करण्यात सहभागी

3. देशभरात ठिकठिकाणी योगशिबिरांचं आयोजन, नितीन गडकरी, रामदेव बाबा, अमित शहा योगसाधनेत दंग, मरीन ड्राईव्हवरही योगदिवसाचं आयोजन

4. भोसरी जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंची न्यायालयीन चौकशी होणार, सरकार लवकरचं न्यायमूर्तींच नाव घोषित करणार

5. विक्रोळी स्थानकात अज्ञात व्यक्तीची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या, सोमवारी दुपारी घडला प्रकार, थरारक दृष्य सीसीटीव्हीत कैद
6. संरक्षण आणि विमान वाहतूक क्षेत्रात 100 टक्के एफडीआय, केंद्र सरकारचा निर्णय, राजन यांच्या राजीनाम्यानंतर अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्याचा प्रयत्न

7. राजन यांच्या भारतीयत्वावर शंका घेणं आचरटपणा, नरेंद्र जाधव यांचा स्वामींवर हल्लाबोल, जाधवांचं भाजपवरही टीकास्त्र 

8. शिवसेनेच्या हिशेबावर भाजपचं लक्ष, राज्य सरकारकडून पालिकेत मुख्य लेखापालांची नियुक्ती, शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न

9. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना जत आणि फोंड्यात ट्रेनिंग, सीबीआयच्या सूत्रांची माहिती, तर वीरेंद्र तावडे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात

10.  हरारेच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताची झिम्बाब्वेर दहा विकेट्सनी मात, धोनी ब्रिगेडनं साधली मालिकेत बरोबरी

Post a Comment

Random Post

 
Top