सकाळच्या हेडलाईन्सवर एक नजर
1. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर केंद्रीय नेतृत्व एकनाथ खडसेंवर निर्णय घेणार, सुत्रांची माहिती, मुख्यमंत्री-अमित शाह भेटीत खडसेंवर चर्चा
2. ठाणे विधानपरिषदेसाठी आज मतदान, डावखरे आणि फाटक यांच्यात चुरस, तर मुंबईत भाजप उमेदवार प्रसाद लाड अर्ज मागे घेण्याची शक्यता
3. मेट्रो हाऊसला लागलेल्या आगीवर सहा तासांनंतर नियंत्रण, पाण्याच्या कमतरतेमुळे अग्निशमन दलाची अडचण, कुलाबा परिसर काळवंडला
4. यंदा सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज, राज्यात हिंगोली, सोलापूर, रत्नागिरीत पावसाची हजेरी
5. नागपुरात कूलरचा शॉक लागून एकाच घरातील तिघांचा मृत्यू, मानकापूर भागातील घटनेनं खळबळ, मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश
6. कोल्हापूरमध्ये मोबाईलवर बोलताना वीज अंगावर कोसळून एकाचा जागीच मृत्यू, मोबाईल लहरींमुळे वीज आकर्षित झाल्याचा संशय
7. सरकारी जमिनीवर ताबा मिळवलेल्या जमावाला पांगवताना मथुरेत दोन पोलीस अधिकारी शहीद, तीन हजाराच्या जमावाबाबत मात्र गूढ कायम
8. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा आज दुसरा स्मृतिदिन, भगवानगडावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
9. बहुप्रतीक्षित 'हाऊसफुल 3' चित्रपटाची आज बॉक्स ऑफिसवर एन्ट्री, तर ओम पुरींचा 'प्रोजेक्ट मराठवाडा'ही आज प्रेक्षकांच्या भेटीला
Post a Comment