0

🌺🌹शुभ सकाळ🙏🏻 🌷

     ...✍🏻 सुपरफास्ट 
  सकाळच्या हेडलाईन्स..,,
दै.माणदूत एक्सप्रेस
       शुक्रवार ३ जून २०१६.
-----------------------
           सांगोला तालुका कुपोषन मुक्त करण्यासाठी बालविकास प्रकल्प विभागाचे प्रयत्न तालुक्याची 0. 28 टक्के कुपोषनाचे  प्रमाण .-पी. बी. भांदककर      बालविकास प्रकल्प अधिकारी सांगोला                                💤✨💤
💧सोलापूर - केंद्रीय दुष्काळी पथक सोलापूर जिल्ह्यात दाखल, अक्कलकोट, वळसंग, दक्षिण सोलापूर, बार्शी येथील पाहणी केली.

💤✨💤
💧सोलापूर : दिवसभराच्या उकाड्याने त्रस्त झालेल्या शहर - जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या वादळी वार्‍यामुळे उंबरगे (ता. बाश्री) येथे भिंत कोसळून दोन शेळ्या, एक म्हैस आणि पोल्ट्री फार्ममधील ६0 कोंबड्या जागीच मृत्युमुखी पडल्या.

💤✨💤
💧सोलापूर - शेळगी , बसवेश्वर नगर येथील गॅस स्फोटा मुळे बाधित झालेल्या कुटुंबाला महापालिकेच्या वतीने पाच हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

💤✨💤
💧सोलापूर - एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णु पवार निलंबित, वरिष्ठ पोलीस अधिका-यांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण भोवले. 

💤✨💤
💧सोलापूर : पळून गेल्याचा राग मनात धरुन मामासह त्याच्या साथीदारानी चक्क भाचीचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच दिवशी प्रेत जाळून टाकले. हा प्रकार २४ एप्रिल २0१६ रोजी मड्डी वस्ती येथे घडला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदला आहे. 

💤✨💤
💧सांगोला : रस्त्याने चाललेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची चेन दुचाकीवरील तिघांनी हिसकावून धूम ठोकली.

💤✨💤
💧इयत्ता बारावीची मूळ गुणपत्रिका आज  विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रियाही सुरू केली जाणार आहे.

💤✨💤
💧मुंबई - मेट्रो हाऊस इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी केली जाणार असून यासंदर्भात पालिका प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत - महापौर स्नेहल

💤✨💤
💧एकनाथ खडसेंवरील कारवाईचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहाच घेतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

💤✨💤
💧पुणे : देशभरात जून ते सप्टेंबर दरम्यान १0४ ते ११0 टक्के पाऊस होणार असल्याचा दुसरा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केला.

💤✨💤
💧मुंबई: नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहिर, आशा काळे, चंदू डेग्वेकर यांना जीवनगौरव

💤✨💤
💧औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आज समोर आले. 

💤✨💤
💧रत्नागिरी - अनेक भागांत जोरदार पाऊस; गुहागर, चिपळूण, रत्नागिरीत वीजपुरवठा खंडीत 

💤✨💤
💧एकनाथ खडसेंबाबतचा निर्णय विधान परिषद निवडणुकीनंतर घेण्यात येणार - सूत्र 

💤✨💤
💧कोल्हापूर - शिवाजी विदयापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

💤✨💤
💧 पिंपरी : महापालिका अतिक्रमण विभागातर्फे अतिक्रमणाची कारवाई सुरू असतांना हिंजवडी येथे गोळीबार, परिसरातील एका व्यक्तीच्या पायाला लागली गोळी,पोलिसांनी जखमी व्यक्तीला केले वायसीएम मध्ये दाखल, आरोपीला अटक

💤✨💤
💧कोल्हापूर: मोटर वाहन निरीक्षकाचा वीज पडून मृत्यू , प्रकाश पाटील असे मृताचे नाव, नाशिक,येवला येथील रहिवाशी, मोबाईलवर पावसात बोलत असताना घडली घटना

💤✨💤
💧औरंगाबाद: जुन्या रिक्षाचे परमिट नव्या रिक्षासाठी ट्रान्सफर करण्यासाठी, परवानाधारक रिक्षा चालकांना आता त्यांची जूनी रिक्षा स्क्रॅप करणे आवश्यक, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतला निर्णय

||-----💫🎀💫------ || 
  ----------------------

Post a Comment

Random Post

 
Top