जळगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात भरिताच्या मोठ्या
वांग्याची 225 क्विंटलपर्यंत आवक झाली, त्यास मागणी वाढल्यामुळे 1000 ते
3500 व सरासरी 2200 रुपये प्रतिक्विंटल दर होता, अशी माहिती बाजार
समितीच्या सूत्रांनी दिली.
बाजार समितीमध्ये गत सप्ताहात थंडीची चाहूल लागल्याच्या स्थितीत कोथिंबीर व मेथी वगळता अन्य भाजीपाल्याची आवक सुधारली होती. तरीही मागणीनुसार पुरवठा नसल्याने बहुतांश सर्व भाजीपाल्याचे दर तेजीतच होते. स्थानिक व नजीकच्या मराठवाड्यातून हिरव्या मिरचीची 150 क्विंटलपर्यंत आवक होऊन 500 ते 1000 रुपये प्रतिक्विंटल दर होता. एरंडोल व धरणगाव तालुक्यांतून होणारी भेंडीची आवक स्थिर होती. उठाव चांगला असल्याने भेंडीला 1400 ते 2200 रुपये प्रतिक्विंटल दर होता. जळगाव तालुका व परिसरातून फ्लॉवरची 175 क्विंटलपर्यंत आवक झाली. मागणीतील सातत्यामुळे फ्लॉवरला 1500 ते 2200 रुपये प्रतिक्विंटल दर होता. नजीकच्या नाशिक जिल्ह्यातून टोमॅटोच्या वैशाली वाणाची आवक वाढून 160 क्विंटलपर्यंत गेली होती, त्यास 600 ते 1000 रुपये प्रतिक्विंटल दर होता. साठवणुकीतील लाल कांद्याची आवक घटली होती, त्यास 350 ते 700 रुपये प्रतिक्विंटल दर होता. परराज्यांतून विक्रीसाठी येणाऱ्या बटाट्याची 1400 क्विंटलपर्यंत आवक झाली होती, त्यास मागणी कायम असल्याने 800 ते 1700 रुपये प्रतिक्विंटल दर होता. आल्याची 160 क्विंटलपर्यंत आवक झाली होती, त्यास 900 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल दर होता. पालेभाज्यांत कोथिंबिरीची 65 क्विंटलपर्यंत आवक झाली होती, मागणीनुसार आवक नसल्याने कोथिंबिरीला 2000 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल दर होता. मेथीची 35 क्विंटलपर्यंत आवक होऊन 2500 ते 4000 रुपये प्रतिक्विंटल दर होता.

Post a Comment