0
नाशिक - नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात दिवसाला टोमॅटोची सरासरी 2200 क्रेटची आवक झाली. प्रति 20 किलो वजनाच्या क्रेटला 150 ते 310 व सरासरी 190 रुपये दर मिळाले. नाशिक हंगामातील टोमॅटोच्या हंगामाने गत सप्ताहात जोर धरला असून आवक व दरातही चांगली वाढ झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत गत सप्ताहात टोमॅटोच्या सरासरी 8820 क्रेटची आवक झाली. प्रति 20 किलो वजनाच्या क्रेटला 150 ते 450 व सरासरी 200 रुपये दर मिळाले. नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम सुरू झाला असून जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत हे महत्त्वाचे मार्केट म्हणून ओळखले जाते. सद्यःस्थितीत टोमॅटोची सर्वाधिक आवक या बाजार समितीत होत आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात टोमॅटो दर वधारले आहेत. दरम्यान, येत्या काळात टोमॅटोचे दर व आवकेत वाढ होईल, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

पावसाचा तडाखा आणि भारत पाक सीमा वाद या घडामोडींचा फटका मागील पंधरवड्यात नाशिक भागातील टोमॅटोला बसला. गत सप्ताहात या स्थितीत आवक 40 टक्‍क्‍यांनी कमी झाली. त्याचा परिणाम होऊन दरात वाढ झाली आहे. दरम्यान कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली राज्यात माल पाठविणारे व्यापारी मोठ्या संख्येने नाशिक भागात दाखल झाले आहेत. येत्या काळात टोमॅटोचे दर टिकून राहतील असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)
वार (तारीख)---आवक---किमान---कमाल---सरासरी
मंगळवार (ता. 11)---30,671---755---2705---1105
बुधवार (ता. 12)---12,869---305--2655---1055
गुरुवार (ता. 13)---57,238---405---2505---1155
शुक्रवार (ता. 14)---56,482---305---2275---905
शनिवार (ता. 15)---44,161---255---1455---1055

Post a Comment

Random Post

 
Top