सोलापूर (प्रतिनिधी) ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात
शनिवारी (ता. 15) कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांना मागणी वाढल्याने
भाज्यांचा बाजार चांगलाच वधारला, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून
सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात शनिवारी भाज्यांची आवक तुलनेने कमीच राहिली. कोथिंबिरीची पाच हजार पेंढ्या, मेथीची दहा हजार पेंढ्या आणि शेपूची सात हजार पेंढ्या आवक राहिली. गेल्या पंधरवड्यापासून भाज्यांच्या दरात तेजी आहे. शनिवारी पुन्हा ही तेजी कायम राहिली. भाज्यांची आवक स्थानिक भागातूनच उत्तर सोलापूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातून झाली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी 400 ते 700 रुपये, मेथीला 700 ते 1100 रुपये आणि शेपूला 400 ते 700 रुपये असा दर मिळाला. गेल्या दोन आठवड्यांत 100 ते 200 रुपयांच्या फरकाने तेजीचे वातावरण राहिले. त्याशिवाय ढोबळी मिरची, वांगी, घेवड्यालाही मागणी वाढली. ढोबळी मिरचीची आवक 50 क्विंटल, वांग्याची 30 क्विंटल आणि घेवड्याला 5 क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटल 600 ते 200 व सरासरी 1000 रुपये, वांग्याला 500 ते 400 व सरासरी 2500 रुपये आणि घेवड्याला 2000 ते 4000 व सरासरी 3000 रुपये असा दर मिळाला. हिरव्या मिरचीचे दरही पुन्हा वधारलेलेच राहिले. हिरव्या मिरचीची 20 क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल 500 ते 150 व सरासरी 700 रुपये असा दर मिळाला.
कांदा जैसे थे
कांद्याच्या दरात मात्र जैसे थे स्थिती राहिली. कांद्याची आवक 20 ते 40 गाड्यांपर्यंत झाली. तीही सगळी आवक बाहेरील जिल्ह्यातून होती. कांद्याला प्रतिक्विंटल किमान 300 रुपये, सरासरी 550 आणि सर्वाधिक 1200 रुपये असा दर राहिला.

Post a Comment