- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील घटना
- विजय शुगर्सने ऊस बिल थकवल्याचे कारण
सोलापूर - करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगर्सकडे २०१४-१५ मध्ये गाळपासाठी घातलेल्या उसाची एफआरपीची बिले सतत पाठपुरावा करूनही थकवण्यात आली. प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त करत माढा तालुक्यातील चार शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १७) सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. आवारात उपस्थित लोकांनी आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. माजी उपमुख्यमंत्री, खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी संबंधित हा कारखाना आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली माढा तालुक्यातील उंदरगावचे अमर नागनाथ मस्के, विजया चंद्रकांत लवटे, दिनकर नामदेव चव्हाण आणि औदुंबर तुकाराम चव्हाण हे शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सोमवारी दुपारी एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले होते. पण आत न जाता आपल्या संतापाचा उद्रेक म्हणून त्यांनी थेट या आवारात आल्यावर अंगावर रॉकेल ओतून घेतले. तेव्हा आजूबाजूला असलेले लोक जमा झाले, त्यानंतर काही वेळातच सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिसही तिथे आले आणि त्यांनी त्यांच्या हातातील रॉकेलचे कॅन आणि अन्य साहित्य हिसकावून घेतले. त्या वेळी काही काळ पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांची समजूत काढली.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे या कारखान्याचे संचालक आहेत. विजय शुगर्सकडे ११ महिन्यांपूर्वी ऊस देऊनही उसाचे एफआरपीप्रमाणे बिल अद्यापही दिले गेले नाही. जिल्हा प्रशासनासह पुणे साखर आयुक्तांपर्यंत सगळ्यास्तरावर पाठपुरावा केला. पण कोणीच दखल घेत नाही. कारखान्यात गेल्यानंतरही तिथे नीट उत्तर मिळत नाही, बिल थकल्याने आर्थिक अडचण वाढली आहे, आम्ही खायचं आणि पुढं करायचं काय, आता हाच एक मार्ग आहे, अशा शब्दांत या शेतकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
सगळीकडे हेलपाटे मारून आम्ही आता थकलो आहोत, येत्या आठ दिवसांत ऊस बिले देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अन्यथा दिवाळीत पहिल्या आंघोळी दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरच आम्ही आंदोलन करू.
- दीपक भोसले, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर

Post a Comment