''अजनाळे गावामध्ये शेतकरी संपास प्रचंड प्रतिसाद''
सांगोला: भूषण येलपले
डाळिंबाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
अजनाळे गावामध्ये दि: २ जून २०१७ रोजी स. ९:०० वाजता
गावातील शेतकऱयांनी पिकवलेले डाळिंब हे रस्त्यावर फेकून या संपामध्ये सामील झाले तसेच दूध हि रस्त्यावरती ओतून ह्या संपामध्ये सामील झाले. अजनाळे गावामधून या संपास चांगला प्रतिसाद मिळाला. अजनाळे गावच्या पिराच्या जवळ हा संप करण्यात आला.यावेळी अजनाळे गावचे सरपंच विजयदादा येलपले यांनी या संपाचे महत्त्व पटवून या संपामध्ये अजनाळे करांना सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी केले.
Post a Comment