हरियाणात जाट आंदोलनाची धग कायम, गोळीबारात आतापर्यंत 7 जण मृत्युमुखी, 80 जखमी, आंदोलनामुळे सुमारे 800 रेल्वेगाड्या प्रभावित———————-
जम्मू-काश्मीरमधल्या पम्पोरमध्ये सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 जवान शहीद, तर 10 जण जखमी———————
-251 रुपयांत मिळणारा मोबाईल फोन आयकर विभागाच्या रडारवर, रिंगिंग बेल कंपनीच्या दाव्यातली सत्यता पडताळणार———————-
चारा छावण्यांवरुन सरकारवर टीका करताना विजय शिवतारेंनी शिव्या हासडल्या, सरकारचा चुकीचा निर्णय सहन करावा लागत असल्याचं वक्तव्य———————-
शरद जोशींची लेखणी साहित्य म्हणून गणली जात नाही हा करंटेपणा, नागपुरातशेतकरी साहित्य संमेलनादरम्यान मान्यवरांची खंत———————
–हार्बरवर बारा डब्यांसाठी घेतलेल्या महामेगाब्लॉकचा आज शेवटचा दिवस, आजमध्यरात्रीपर्यंत गाड्या बंद राहणार—————————–
उल्हासनगर पालिकेचे उपायुक्त युवराज भदाणेंना जिवंत जाळण्याचा प्रयत्न,कारमधून पळ काढल्यानं जीव वाचला, आरोपी फरार————————————
–पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, वर्ध्याच्यादेवळी तालुक्यातील दिघी बोपापूर गावातील घटनेनं खळबळ———————
नागपूरच्या हिंगणामध्ये मध्यान्ह भोजनातून 126 विद्यार्थ्यांना विषबाधा, दोषींवर कारवाई करण्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन————————
कसोटीत सर्वाधिक वेगवान शतकाचा विक्रम न्युझीलंडच्या ब्रँडन मॅक्क्यूलमच्या नावावर, अवघ्या 54 चेंडूत झळकावलं शतक
Post a Comment