द्राक्षावरील खोडकिडा- समस्या आणि व्यवस्थापन
:
भारतामध्ये द्राक्षावर खोडकिडा प्रथमत: विभागीय फळ संशोधन केंद्र पुणे येथे सन १९६८ मध्ये आढळून आली.सुरुवातीस ही कीड दुय्यम स्वरूपाची होती कारण या किडीचे प्रमाण एक-दोन टक्केच दिसून येत असे शिवाय ज्या बागा जुन्या झालेल्या असत अशाच बागांमध्ये ही कीड आढळून येत असे.त्यामुळे द्राक्षबागायतदार या किडीचा प्रामुख्याने असा विचार करत नसे.परंतु द्राक्षबागायतदार खुंटाकडे वळले तस तसे या किडीचे प्रमाण वाढत असतांना दिसून येत आहे.आज या किडीचा विचार केला असता ही एक प्रमुख कीड म्हणून ओळखली जाते.हल्ली ह्या किडीचे प्रमाण ५०ते ९० टक्क्यांनी वाढले आहे.या किडीस पोषक असलेले उष्ण कोरडे वातावरण आणि पाण्याची कमतरता शिवाय योग्य खुंट रोपाची निवड न केल्या गेल्या मुळे आणि खोडावर तसेच ओलांड्यावर अनावधनाने झालेल्या जखमामुळे ही कीड वाढते.
किडीची ओळख:
खोड किडीचे भुंगेरे हे २-३ से.मी.लांब व विटकरी रंगाचे असतात शिवाय अन्टेना (मिशा)ह्या शरीरा पेक्षा जास्त लांब असतात.हे भुंगेरे पावसाळ्यात रात्रीच्या वेळी प्रकाशाकडे आकर्षित होतात.खोड किडीची अळी ही रंगाने पांढरट पिवळसर असते.अळीचे डोळे हे चपटे असून लहान असतात.शिवाय ह्या अळीला पाय नसतात,फक्त शरीरच्या हलचाली वरून अळी खोडात किंवा ओलांड्यात मागे पुढे सरकते.
किडीचा जीवनक्रम:
खोड किडीचे मादी भुंगेरे जून-जुलै महिन्यात बाहेर पडून खोडावर किंवा ओलांड्यावर ज्या ठिकाणी वेलीला जखमा असतील तेथे किंवा जखमा करून त्यात १०० ते २०० अंडी घालते.अंडी दीड ते दोन आठवड्यात उबवून अळ्या बाहेर येतात.बाहेर पडलेल्या अळ्या खोड तसेच वलांडे पोखरण्यास सुरवात करतात.अळीने खोडात किंवा ओलांड्यात प्रवेश केल्यानंतर ४ ते ६ महिने आतच राहते.कोषावस्था हीसुद्धा आतच असते.कोषावस्था एक महिन्याची असते.कोषांतून बाहेर पडलेले भुंगेरे तीन महिन्या पर्यत जगू शकतात.अशा त-हेने एक वर्षात फक्त एकच जीवनक्रम पूर्ण होतो.
अड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या जखमेच्या ठिकाणी पोखरण्यास सुरवात करतात.खोड किंवा ओलांडे पोखरलेल्या वेलीचे पाने प्रथम पिवळी दिसू लागतात.आणि नंतर या पानांवर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यासारखी लक्षणे दिसू लागतात.कालांतराने अशा वेली किंवा ओलांडे वाळून जातात.खोडात किंवा ओलांड्यात जर अळी असेल अशा वेळी अळीने पाडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर येत असतो.कारण जर खोडावर किवा आजुबाजूला निरीक्षण केले असता आपणास भुसा दिसून येतो.
ज्या बागा खुंटावर आहेत (रुट) अशा बागेमध्ये आपणास जरा वेगळा अनुभव येतो.कलम करतांना द्राक्ष बागायतदार चार ते पाच फुटवे ठेवतात. कलम करते वेळी फक्त चांगल्या निरोगी पेन्सिल आकाराच्या दोन काडयावर कलम केले जाते.आणि शिल्लक फुटवे कट केले जातात. परंतु अशा ठिकाणी पेस्ट केली जात नाही.या कट केलेल्या फुटव्यावर(कड्यावर ) मादी भुंगेरे अंडी घालतात.आणि त्याच ठिकाणा पासून पोखरण्यास सुरुवात करतात.त्यामुळे आपणास खुंटावरील बागेत दुस-या वर्षापासूनच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.याचा अर्थ खुंटावरील बागेत खोड किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो असा नाही तर आपण वेलीला केलेल्या जखमांमुळे मादी भुंगे-यांना अंडी घालण्यास वाव मिळतो.म्हणून खुंटावर कलम केल्यानंतर पेस्ट केलीच पाहिजे.
व्यवस्थापन:
१) जून तसेच जुलै महिन्यात बागेजवळ प्रकाश सापळे लावले असता या सापळ्याकडे खोड किडीचे भुंगेरे आकर्षित होतात.असे आकर्षित झालेले भुंगेरे रॉकेल मिश्रीत पाण्यात नष्ट केले असता पुढील उत्पत्ती थांबेल.
२) आपल्या द्राक्ष बागेत खोडावर तसेच ओलांड्यावर जखमा होणार नाही याची दक्षता घ्यावी.जखमा असल्यास खोड तसेच ओलांड्यावर १:१ या प्रमाणात ब्लायटोस आणि कार्बारीलचे पेस्टीग करावे.पेस्टीग हे एप्रिल तसेच ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस घेणे अधिक चांगले.
३) छाटणी आगोदर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास असे ओलांडे,खोड किंवा काड्या करवतीने काढून घ्याव्या.आणि जखमांवर वरील प्रमाणे पेस्टीग करावे.
४)रुटस्टोकवर कलम करतांना अतिरिक्त फुटवे काढल्यानंतर त्यावर पेस्ट करावे.म्हणजे नवीन बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
५)बागेत खोड किडीचा प्रादुर्भाव झालेला आसेल अशा वेळी खोड किडीचे छिद्रे तारेच्या साह्याने मोकळी करावीत.व अशा छिद्रात इंजेक्शनच्या साह्याने नुवान २० मिली प्रतिलीटर या प्रमाणात द्रावण तयार करून प्रत्येक छिद्रात २० ते २५ मिली या प्रमाणात सोडून छिद्र गाळाच्या साह्याने हवाबंद करावीत.नुवान खेरीज आपण क्लोरोपायरीफॉस सुद्धा वापरू शकता.क्लोरोचे प्रमाण २५ मिली प्रतिलीटर या प्रमाणात वापरावे.
६) माझ्या प्रयोगानुसार छिद्रात इंजेक्शनच्या साह्याने जर पेट्रोल सोडून गाळाच्या साह्याने छिद्र लगेचच बंद केलीतर खोड कीड लगेच मरते.
विषारी आमिष वापरताना वर्षातून दोन तीन वेळेस वापरावे.
अशा त-हेने द्राक्ष बागायतदार बंधूंनी आपल्या बागेची सुरुवातीपासूनच काळजी घेतली तर निश्चित खोड किडीचे प्रमाण एकदम कमी होऊन आपल्या बागेचे होणारे नुकसान टाळता येणार
शेतीमुळे विसरतोय नोकरीतील ताणतणाव
सरकारी नोकरी म्हणजे निवांत जीवन, अशी सर्वसाधारण धारणा असते. काही लोक मात्र पगारासाठी नोकरी अन् त्यातून वेळ काढून जगण्याचा आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ घालवितात. पोलिस खात्यामध्ये कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून खाकीचा रुबाब वाढविणारे बेळंकी (ता. मिरज, जि. सांगली) येथील विजयकुमार कोडग हे शेतीतही त्याच दक्षतेने नियोजन करतात. धकाधकीच्या नोकरीचा ताण काळ्या मातीत घाम गाळताना नाहीसा होतो, असं ते सांगतात.
सांगली येथील पोलिस मुख्यालयामध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणारे विजयकुमार पांडुरंग कोडग यांचे मूळ गाव बेळंकी. हे गाव सांगलीपासून ३६ किलोमीटरवर आहे. पोलिस खात्यातील नोकरी म्हणजे २४ तास ड्युटी, परिसरात कधी कुठे काय घडतयं का? कुठेही जावे लागणार... हेच सातत्याने डोळ्यासमोर. पण यातूनही मिळालेल्या आठवड्याच्या सुटीमध्ये गावाकडील शेतात रमण्याचा आनंद ते घेतात. आठवड्यातील एक दिवस ते शेतीसाठी आनंदाने राखून ठेवतात.
शेतीमधील अनुभवाबाबत विजयकुमार कोडग म्हणाले की, माझी वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. पूर्वी वडील शेती बघायचे. पारंपरिक शेती करायचे. आमची जत तालुक्यात सहा एकर आणि उर्वरित चार एकर शेती बेळंकी येथे आहे. माझा मोठा भाऊ दुग्ध व्यवसाय पाहतो, मी शेतीचे नियोजन बघतो. तिसरा भाऊ लष्करामध्ये आहे. सध्या या शेतीमध्ये उसाची लागवड अाहे. याचबरोबरीने हंगामानुसार मका, हरभरा, कांदा, लसूण या पिकांची लागवड करतो. पहिल्यांदा मी लष्कराच्या सेवेत होतो. या वेळी वर्षातून दोन महिन्यांची सुटी मिळायची. सुटीला आले, की शेतीमध्ये पीक नियोजनात सहभाग असायचा. पहिल्यापासून शेती पद्धतीची माहिती असल्यामुळे शेती करणे सोपे गेले. सन २००६ मध्ये लष्करातून निवृत्त झालो. पारंपरिक शेतीला अत्याधुनिक
"सरकारचे धोरण हेच वाढत्या शेतकरी
परभणी- वाढत्या शेतकरी आत्महत्यांचे कारण दुष्काळ नसून सरकारचे धोरण आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले.
रुमना (ता. गंगाखेड) येथे शनिवारी (ता. 6) शेतमालाच्या आधारभूत किमती निश्चित करण्यासाठी कृषिमूल्य आयोगाकडे राज्य सरकारने केलेल्या शिफारशी, त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या आधारभूत किमती यातील तफावत दर्शविणाऱ्या फलकाचे अनावरण श्री. पाटील यांच्या उपस्थित करण्यात आले. या वेळी आयोजित सभेत श्री. पाटील बोलत होते. शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष अमृत शिंदे, सरपंच राम मानवतकर, त्र्यंबक सुरवसे, माउली जोगदंड, अण्णा जोगदंड, शेख सलीम, गंगाखेड तालुकाध्यक्ष बंडू सोळंके आदींसह शेतकरी या वेळी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, भाजपने सत्तेत आल्यानंतर डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी घूमजाव केले आहे. याबाबत केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी 10 मार्चला दिल्ली येथील जंतर मंतर येथे शेतकरी संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे.
: एकाच रोपापासून मिळेल टोमॅटो- बटाटा उत्पादन!
ब्रिटिश कंपनीने विकसित केली कलमी रोपे
थॉम्पसन आणि मॉर्गन ही ब्रिटिश कंपनी लवकरच "टोमटॅटो'ची रोपे बाजारात आणणार आहे. "टोमटॅटो' हा शब्द टोमॅटो आणि पोटॅटो या दोन इंग्रजी शब्दांपासून बनविलेला आहे. या रोपांपासून एकाच वेळी टोमॅटो आणि बटाटा यांचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. यामुळे एकाच कुंडीमध्ये कमी जागेमध्ये दोन्ही भाज्यांचे उत्पादन घेणे आता शक्य होणार आहे. शहरातील बागा आणि गच्चीतील परसबागेसाठी या प्रकारची रोपे आदर्श असल्याचे मत कंपनीच्या वतीने मांडण्यात आले आहे.
शहरामध्ये कमी जागेमध्ये भाज्यांचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात, त्यांच्यासाठी इंग्लंडमधील एका कंपनीने एक नवे उत्पादन बाजारात आणले आहे. त्यांनी एका कुंडीमध्ये "टोमटॅटो'चे रोप उपलब्ध करून दिले आहे. या रोपापासून एकाचवेळी टोमॅटो आणि मातीमध्ये बटाटे यांचे उत्पादन घेता येते. एका झाडापासून सुमारे 500 चेरी टोमॅटो पूर्ण कालावधीमध्ये मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्याबाबत माहिती देताना थॉम्पसन आणि मॉर्गन या कंपनीचे व्यवस्थापक मायकेल पेरी यांनी सांगितले, की हे झाड शंभर टक्के नैसर्गिक असून, कोणत्याही प्रकारे जनुकीय बदल करण्यात आलेले नाहीत. बटाट्याच्या रोपावर टोमॅटोचे कलम हाताच्या साह्याने करण्यात आले आहे. ही कलमाची प्रक्रिया अत्यंत नाजूक असून, त्यासाठी कौशल्याची आवश्यकता असते. कमी जागेमध्ये अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हा टोमॅटो अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पुढील हंगामापासून "टोमटॅटो'च्या रोपांची विक्री कंपनी सुरू करणार असून, त्याची किंमत 15 ब्रिटिश पौंड (सुमारे 1500 रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे.
अशी बनविली जातात "टोमटॅटो' रोपे - टोमॅटो आणि बटाटा ही पिके एकाच सोलॅन्सिस या कुळातील आहेत, त्यामुळे त्यांचे कलम करणे शक्य आहे.
- दोन्ही रोपांपासून अत्यंत लहान आकाराचा तुकडा काढण्यात येतो, त्यामध्ये विषाणूंचा प्रादुर्भाव नसल्याची खात्री करून, प्रथम एका जेलमध्ये व नंतर कंपोस्टमध्ये त्यांची वाढ केली जाते.
- दोन इंच उंचीची रोपे झाल्यानंतर, त्यावर तिरका काप घेऊन कलम केले जाते. एकमेकांशी जुळून येईपर्यंत म्हणजे साधारणपणे एक आठवड्यापर्यंत क्लिपांनी जोडून ठेवले जाते.
- खालील बाजूला बटाटा रोपाची मुळे आणि वरील बाजूला टोमॅटोच्या फांद्या असे त्याचे स्वरूप ठेवले जाते.
...अशी झाली सुरवात - थॉम्पसन आणि मॉर्गन या बागकामविषयक कंपनीचे संचालक पॉल हॅन्सोर्ड यांच्या अमेरिका भेटीच्या वेळी पंधरा वर्षांपूर्वी टोमॅटो आणि बटाटा या रोपांचे कलम करण्याची कल्पना आली.
- त्या कल्पनेवर सातत्याने काम करत, त्यांनी कलम करण्याची प्रक्रिया निर्दोष करण्याचा प्रयत्न केला.
- हॉलंड येथील विशिष्ट प्रयोगशाळेमध्ये उत्पादन करण्यात येत आहे. त्यानंतर ती रोपे इंग्लंडमध्ये आणून हरितगृहामध्ये वाढविण्यात येतात. 40 लिटरच्या बॅगेमध्ये किंवा मोठ्या कुंड्यांमध्ये ही रोपे ठेवली जातात.
- 3.5 इंच उंचीची झाल्यानंतर "टोमटॅटो'च्या रोपांची विक्री करण्यात येणार आहे.
Post a Comment