0

शामली (उत्तर प्रदेश), दि. ८ - उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीतील विजयानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात केलेला गोळीबार एका ९ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला. या गोळीबारात त्या मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शामली जिल्ह्यातील नफीसा येथे पार पडलेल्या स्थानिक निवडणुकीतसमाजवादी पक्षाने विजय मिळवला, हे कळताच सपाच्या कार्यकर्त्यांनी हवेत गोळीबार करण्याससुरवात केली. सुमारे अर्धा तास हा गोळीबार सुरू होता. त्याचवेळी रिक्षातून जाणा-या एका९ वर्षांच्या मुलाला ही गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाटी तातीडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या दुर्दैवी घटनेनंतर मुलाच्या नातेवाईकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत पानीपत-खातीम महामार्ग रोखून धरला. दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली आलेली नाही.

Post a Comment

Random Post

 
Top