0

एक नजर सकाळच्या हेडलाईन्सवर:

1. 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीची अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष, मुंबईतल्या विशेष मकोका न्य़ायालयात साक्ष नोंदण्यास सुरूवात

2. लवकरच टोलनाक्यावर मॉनिटरिंग यंत्रणा, मुदतीपूर्वी टोलवसुली झाल्यास सरकारला मिळणार 90 टक्के रक्कम, कोल्हापुरातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा

3. हेल्मेट सक्तीवरुन शिवसेना-भाजप आमनेसामने, हेल्मेटची सक्ती नको, भाजपची मागणी, तर सक्ती फक्त पुण्यात नाही, तर अवघ्या राज्यात, रावतेंचं स्पष्टीकरण

4. चौथऱ्यावरून शेवटची पूजा महिलांच्या हातून होऊ द्या, भूमाता ब्रिगेडचा प्रस्ताव शनि ट्रस्टनं फेटाळला, रविशंकरांसोबत मध्यस्तीची बैठकही निष्फळ

5. सोलापुरात चंद्रकांत पाटलांनी वापरलेल्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर कारवाई, आरटीओ अधिकाऱ्यांकडून फॅन्सी नंबरप्लेट जप्त, आरटीओकडून दंडाचीही वसुली

6. देवनार संदर्भात चेंबूरच्या रहिवाश्यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट, नागरिकांच्या तक्रारींवर अंमलबजावणी करण्याचे पालिका आयुक्तांना आदेश

7. औरंगाबादेत गटाराच्या खड्ड्यात पडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू, पालिकेवर हलगर्जीपणाचा आरोप, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

8 भारत हा प्रचंड सहिष्णू देश, अभिनेत्री कतरिना कैफचं एबीपी माझावर वक्तव्य, आयुष्यभर भारतात राहायची इच्छा

9. बंगळुरूच्या शाळेत बिबट्याचा धुमाकूळ, तीन जणांना जखमी करणारा बिबट्याला अखेर पकडण्यात यश, सुट्टीचा दिवस असल्यामुळं अनर्थ टळला

Post a Comment

Random Post

 
Top