0

बाजारभाव

पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली

8 फेब्रुवारी 2016

पुणे - थंडीचा कडाका संपून उष्णता वाढत असल्याने राज्यातील भाजी पाल्याचे उत्पादन तुलनेने वाढले आहे. परिणामी, गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ७) भाजीपाल्याची सुमारे २०० गाड्या आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ३० गाड्यांनी जास्त हाेती. आवकेमध्ये पाले भाज्यांसह फळ भाज्याची आवक माेठ्या प्रमाणावर हाेती. पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची दाेन तर मेथीची सुमारे अडीच लाख जुड्या आवक झाली हाेती. 
परराज्यांतून होणाऱ्या आवकेत कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून १० ते १२ टेंपो हिरवी मिरचीची, मध्य प्रदेशातून सुमारे २५ ट्रक मटारची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ५ ते ६ टेंपो शेवग्याची, राजस्थान येथून सुमारे १० ते १२ ट्रक गाजराची, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातून कोबीची ५ ते ६ ट्रक आवक झाली होती. मध्य प्रदेशातून सुमारे ३५०० गोणी लसणाची, तर इंदाैर येथून बटाट्याची सुमारे १५ ट्रक आवक झाली हाेती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे ५५० गोणी, टोमॅटोची सुमारे सहा हजार क्रेट्स, कोबीची ८ ते १०, फ्लॉवरची सुमारे २५ टेंपो, ढोबळी मिरचीची १५ टेंपो, तांबडा भोपळाची आणि पावटाची प्रत्येकी ५ ते ६ टेंपो, पुरंदर, पारनेर येथून मटारची सुमारे ३ टेंपाे तर शेवग्याची सुमारे सहा टेंपाे आवक झाली हाेती. कांद्याची सुमारे १७५ ट्रक, तर स्थानिक बटाट्याची सुमारे ४० टेंपाे आवक झाली होती.

फळभाज्यांचे दर (प्रति १० किलो) -
कांदा - ८०-१२०,
बटाटा -
स्थानिक ७० - ९०,
इंदाैर ११० - १२०,
लसूण : ६००-१२००,
आले - सातारी : २६०-२८०,
भेंडी : २५०-३५०,
गवार -
गावरान, सुरती ६००-८००,
टोमॅटो : ६०-१००,
दोडका : २५०-३५०,
हिरवी मिरची : ३५०-४००,
दुधी भोपळा : ५० - १००,
चवळी : २५०-३००,
काकडी - २५०-३५०,
कारली :
हिरवी : ४००-४५०,
पांढरी : २५०-३५०,
पापडी : १४० -१५०,
पडवळ : १५०-१६०,
फ्लॉवर : ४०-६०,
कोबी : ६० -८०,
वांगी : १००-१५०,
डिंगरी : २००-२५०,
नवलकोल : १००-१२०,
ढोबळी मिरची : १४०-१८०,
तोंडली :-
कळी : २५०-२८०,
जाड : १००-१२०,
शेवगा : २००-३००,
गाजर : ५०-७०,
वालवर : १५०-२००,
बीट : १००-१२०,
घेवडा : २८०, ३००,
कोहळा : १५०-२००,
आर्वी : १८०-२००,
घोसाळे : २००-२५०,
ढेमसे : २००-२५०,
मटार
परराज्य :१६०-१८०,
स्थानिक २००-२१०,
पावटा : २४०-२५०,
तांबडा भोपळा १२०-१६०,
सुरण - २४०-२५०,
नारळ - १०००-१६००,
मका -५०-१००. 

पालेभाज्यांचे दर (शेकडा) -
कोथिंबीर - २००-५००,
मेथी : २००-३००,
शेपू : ४००-५००,
कांदापात : ४००-५००,
चाकवत : ३००-६००,
करडई : ३००-५००,
पुदिना : २००-३००,
अंबाडी : ३००-४००,
मुळे : ५००-८००,
राजगिरा : ३००-४००,
चुका : ३००-५००,
चवळई : ४००-५००,
पालक : ३००-५००,
हरभरा गड्डी - ५००-७००. 

फळांचे दर - फळ विभागात लिंबाची सुमारे सहा हजार गोणी आवक झाली हाेती. डाळिंबाची सुमारे ४५ टन, मोसंबीची सुमारे ७० तर संत्राची ३० टन, पेरूची सुमारे १ टन, चिकूची सुमारे तीन हजार गाेणी, विविध जातींची बोरांची सुमारे पाचशे गोणी आवक झाली होती. विविध जातींच्या द्राक्षांची सुमारे २५ टन, तर स्ट्रॉबेरीची सुमारे ६ टन आवक झाली होती. कलिंगडाची सुमारे ४० टेंपाे, खरबुजाची ६ टेंपाे आवक झाली हाेती. सीताफळाची १, तर अंजिराची २ टन आवक झाली हाेती. लालबाग आंब्याची सुमारे तीनशे किलाे आवक झाली असून, प्रति किलाेला ९० ते १०० रुपये दर हाेता. 

लिंबू (प्रति गोण) : २००-५००, डाळिंब : (प्रति किलो)
आरक्ता : १०-५०,
गणेश : १०-४०,
भगवा : ३०-११०,
मोसंबी :
(३ डझन) १००-२२०,
४ डझन : ५०-१२०,
संत्रा :
(३ डझन) १००-२५०,
(४ डझन) ५०-१२०,
पपई : (प्रति किलो) ३-१२,
कलिंगड : (किलो) ५-१२,
खरबूज : (किलो) १०-३०,
पेरु (२० किलो) : ७००-८००,
द्राक्षे -  (१५ किलो)
शरद सीडलेस ७००-९००,
सोनाका ७००-११००,
द्राक्षे - (१० किलाे)
जम्बाे ७००-९००,
थॉमसन ४००-६००,
तास गणेश ५५०-८००,
कृष्णा शरद ७००-९००,
सफरचंद :
डेलिशिअस (१५ कि) ७००-१३००,
किन्नोर (२०-२५) १५००-२०००,
महाराजा (१५) ४००-५००,
बोरे :
उमराण (१० कि) ४००-५००, चमेली (१० कि) १५०-२२०, चण्यामण्या - (१० कि) २६०-३००,
सिताफळ २०-१४०,
स्ट्राॅबेरी (२ किलाे पनेट) ८०-१५०. 

फुलांचे दर (प्रति किलो) -
झेंडू : १०-४०,
गुलछडी : ६०-१२०,
बिजली : २०-४०,
कापरी : १०-४०,
सुटा कागडा : ४००-५००,
ॲस्टर : (चार गड्ड्या) १०-१६, गलांड्या ६-१२,
गुलाब गड्डी : ५-१५,
डच गुलाब : ८०-१२०,
ग्लॅडिएटर : ८-१५,
जरबेरा : ३०-५०,
कार्नेशियन : १००-१५०. 

अंडी - गावरान
(शेकडा) ७२०,
डझन ९६,
प्रतिनग ८,
इंग्लिश
(शेकडा) ४३० ,
डझन ६०,
प्रतिनग ५
सौजन्य अग्रोवन

Post a Comment

Random Post

 
Top