तैपेई, दि. ६ - दक्षिण तैवानच्या तैनान शहराजवळ शनिवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले असून या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. भूकंपाच्या धक्क्यामुळे इमारतकोसळून काही नागरिक मृत्यूमुखी पडले तर सुमारे २२१ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी मोजली गेली. भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे चार वाजता हा धक्का बसला.तैनान शहरापासून ३६ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे रहिवासी इमारत कोसळली ५ जण ठार झाले. तर इतर नागरिकांना अग्निशमनदलाच्या जवानांनी बाहेर काढले. लष्कराचे जवानही मदतीला धावले असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणीहलविण्यात येत आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment