0

वॉशिंग्टन, दि. 7 - इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना पकडून महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी त्यांचा क्रूर छळ करायला हवा, तसेच त्यांच्या बायका-मुलांना ठार मारायला हवे, असं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं आहे. रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळण्याच्या स्पर्धेत सध्या आघाडीवर असलेल्या ट्रम्प यांनी मी जर अमेरिकेचा अध्यक्ष झालो तर हे करीन असं म्हटलंय.इस्लामिक स्टेटसाठी कुठलेही नियम नाहीत, ते त्यांना हवं तसं वागू शकतात आणि आपण मात्र अनेक नियमांनी जखडलेलो असल्यामुळे आपलं नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला. दहशतवाद्यांचा नायनाट करायचा असेल तर त्यांच्याशी तितक्याच क्रूरपणे वागायला हवं असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे थर्ड डिग्री म्हणतो त्याप्रमाणे कैद्यांचा शारीरिकव मानसिक छळ करून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती काढण्याची पद्धत अमेरिकेत होती. मात्र, ओबामा यांनी ती 2009 मध्ये बंद करून दहशतवाद्यांनाही मानवतावादी वागणूक देण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही, तर दहशतवाद्यांच्या बायका-मुलांनाही ठार मारायला हवं असं ते एका मुलाखतीत म्हणाले."दहशतवादी जसे हा खेळ खेळतात, आपल्यालाही तो तसाच खेळायला हवा. आपण सौम्यपणे वागतो, तरत्यांच्या क्रूरपणाला कसलंही मर्यादा नाही. आपल्या या दुर्बल मानसिकतेमुळे आपण इस्लामिक स्टेटचा परबाव करू शकलेलो नाही." असं ट्रम्प म्हणाले. अर्थात, नंतर प्रसिद्धीपत्रक काढून आपण अध्यक्ष झालो तरी, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करू आणि अमेरिकी लष्कराला कायद्यापलीकडे जाऊन वागण्याचा आदेश देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Post a Comment

Random Post

 
Top